शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला विकास कामांचा पुळका अकोलेकर म्हणतात, विकास कामे आताच कशी?

By admin | Updated: August 21, 2014 00:44 IST

आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या जुजबी विकास कामांना भारतीय जनता पार्टीकडून पूर्णत्वास नेण्याचा खटाटोप केला जात आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या जुजबी विकास कामांना भारतीय जनता पार्टीकडून पूर्णत्वास नेण्याचा खटाटोप केला जात आहे. संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीत ठोस विकास कामांना तिलांजली देणार्‍या राजकारण्यांनी अकोलेकरांच्या नजरेस पडतील,अशी कामे करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. चाणाक्ष अकोलेकरांच्या नजरेतून ही बाब सुटली नसून, ही विकास कामे आताच कशी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.निवडणुका जवळ आल्या म्हणजे इच्छुक उमेदवारांना अचानक कार्यकर्त्यांची आठवण येते. त्यांची आस्थेने विचारपूस करून काय हवे, काय नको, याची खातरजमा केली जाते. जी कामे जाणीवपूर्वक पाच वर्षांपासून लटकवून ठेवली जातात, त्या कामांना निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण करण्याचा प्रघात जोपासल्या जातो. हा प्रकार चाणाक्ष नागरिकांच्या नजरेतून कधीही सुटला नाही; परंतु सर्वसामान्य नागरिकांना पाच वर्षांत हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, याची जाणीव असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यातच लोकप्रतिनिधींनी धन्यता मानली आहे. असाच काहीसा प्रकार शहरात भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवारांकडून होत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना विकास कामांसाठी वर्षाकाठी २ कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त होतो. भाजपातील लोकप्रतिनिधींच्या वाटेला आलेल्या या निधीतून ठोस व दर्जेदार विकास कामे मार्गी लागणे अपेक्षित असताना, कंत्राटदार बनलेल्या कार्यकर्त्यांना गब्बर करण्याच्या प्रयत्नात निकृष्ट रस्ते, नाल्या, समाजमंदिर बनविण्यात आले. अवघ्या पाच ते सहा महिन्यात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाल्याचे चित्र शहरात दिसून येते. विधानसभा निवडणूक लक्षात घेता, मागील सहा महिन्यांपासून अकोला पि›म मतदारसंघात जुजबी विकास कामे पूर्ण करण्यावर इच्छुक उमेदवारांनी भर दिला आहे. यामध्ये अवघ्या आठ फूट रुंदीचे डांबरी रस्ते, नालीवरील धापा, नाल्या, बगिच्यांचे सौंदर्यीकरण आदींचा समावेश आहे. शिवाय गत चार वर्षांपासून सतत बंद पडलेली ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा (अवघ्या तीन चौकातील) अचानक सुरू करण्याची इच्छा उफाळून वर आली आणि तडक निधी देत, भव्य सोहळादेखील घेण्यात आला. ही सर्व जुजबी विकास कामे अचानक सुरू झाल्याने सुज्ञ नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.