शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, राकॉँकडून मराठा कार्डचा वापर !

By admin | Updated: September 29, 2014 02:07 IST

अकोला जिल्ह्यात ‘सोशल इंजिनिअरिंग’ला तिलांजली.

अजय डांगे / अकोलाजिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने मराठा कार्डचा वापर केल्याचे उमेदवारांवर नजर टाकल्यास दिसून येते. अकोला पूर्व, बाळापूर आणि आकोटमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने अकोला पश्‍चिम, आकोट व अकोला पूर्व मतदारसंघात मराठा समाजातील उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णच्या गप्पा मारणार्‍या दोन्ही पक्षांपुढे इतर समाजातील मतं खेचण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे. शिवसेना-भाजप महायुती आणि कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाली. महायुती आणि आघाडीतील चारही पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध सुरू झाला. काही नेत्यांनी इतर पक्षातून उमेदवार आयात करण्यासाठीही चाचपणी केली. स्वपक्षाने उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांनीही इतर पक्षांशी संपर्क साधला. दरम्यान, आघाडी आणि महायुती तुटल्याने चारही पक्षातील नेत्यांनी स्वत:च्या सर्मथकांच्या पदरात उमेदवारी कशी पडेल, यासाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली. काहींनी तर त्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा केला. सम र्थकांना पुढे करताना नेत्यांनी केवळ स्वत:च्या समाजाचा विचार केला. इतर समाजातील इच्छुकांना संधी देण्याचा विसर त्यांना पडल्याचे दिसून येते. भाजपने पाचपैकी अकोला पूर्व, बाळापूर आणि आकोट या तीन मतदारसंघातून मराठा उमेदवारांना संधी दिली. मूर्तिजापूर मतदारसंघ राखीव असून, अकोला पश्‍चिम मतदारसंघातून हिंदी भाषिक उमेदवार उभा केला. भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी कॉँग्रेसनेही मराठा कार्डचा वापर केला. अकोला पूर्व, आकोट आणि अकोला पश्‍चिममधून मराठा समाजातील उमेदवारांना तिकिटं दिली. एरव्ही ह्यसोशल इंजिनिअरिंगह्णच्या गप्पा करणार्‍या दोन्ही पक्षांची इतर समाजातील मतं खेचण्यासाठी कसोटी लागणार आहे.