शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी भारिपचा धडक मोर्चा

By admin | Updated: July 14, 2015 02:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा; दुबार पेरणीसाठी अनुदान देण्याची मागणी.

अकोला : दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करून, दुबार पेरणीसाठी शंभर टक्के अनुदान देण्याच्या मागणीकरिता भारिप-बहुजन महासंघ जिल्हा शाखेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला तरी, जोरदार पाऊस झाला नसल्याने, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडील कर्ज शासनाकडून सरसकट माफ करण्यात यावे, तसेच दुबार पेरणीसाठी शेतकर्‍यांना शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने कामे सुरू करून, बेरोजगार व मजुरांना कामे उपलब्ध करुन द्यावी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंंना मोफत प्रवास पास उपलब्ध करुन देण्यात यावा,नगरपालिका, महानगरपालिका हद्दीतील रमाई आवास घरकूल योजनांची तातडीने अंमलबजाणी करुन घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, विविध योजनांतर्गत प्राप्त निधीचे लाभार्थींंंना वितरण करण्यात यावे आणि सामाजिक न्याय भवनाचा रखडलेला प्रश्न तातडीने मार्गी लावावा इत्यादी मागण्यांसाठी भारिप-बमसं जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील टॉवरचौकस्थित भारिप-बमसंच्या जिल्हा कार्यालयासमोरून काढण्यात आलेला मोर्चा बसस्थानक समोरून गांधी रोड, तहसील कार्यालय मार्गे मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर एका शिष्टमंडळामार्फत मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांना सादर करण्यात आले.