शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

बळेगाव, वणी येथे घर, गोठय़ाला आग; सहा लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 1:48 AM

वणी वारुळा: अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरातील वणी येथे रमेश केशवराव पालखडे, गणेश पालखडे यांच्या गोठय़ाला ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने ५ लाखांच्या जवळपास नुकसान झाले, तर बळेगाव येथे घरांना आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवणी वारुळा: अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरातील वणी येथे रमेश केशवराव पालखडे, गणेश पालखडे यांच्या गोठय़ाला ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने ५ लाखांच्या जवळपास नुकसान झाले, तर बळेगाव येथे घरांना आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले. बळेगाव येथील मजूर वर्ग शेतात कामाला निघून गेल्यावर येथील झोपडपट्टीमध्ये अचानक आग लागली. लहान मुलांना व गावकर्‍यांना ही आग दिसताच गोंधळ उडाला तर महिलांनी घरामधील गॅस सिलिंडर बाजूच्या शेतात नेऊन टाकले, तर गावकरी धावून आले. प्रत्येकाच्या घरातील पाणी टाकूनसुद्धा आग आटोक्यात येत नव्हती. तेव्हा अकोट येथील अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. ही अग्निशामक दलाची गाडी अकोटात पोहचत नाही तर वणी येथे शेतीचे सामान ठेवलेल्या गोठय़ाला दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत रमेश केशवराव पालखडे यांच्या शेतीचे सामान, फवारणी मशीनसह शेतीचे साहित्य, स्प्रिंकलर पाइपसह तुरीचे कट्टे, नवीन ताडपत्र्यांसह ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले आहे. गणेश केशवराव पालखडे यांचे कुटार व शेतीचे साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये त्यांचे एक लाखांच्या जवळपास नुकसान झाले. तसेच बळेगाव येथील आयशाबी व साबीर खा पठाण यांचे घर जळल्याने १ लाखाचे घरातील साहित्य व पाइप जळून खाक झाले. काशिनाथ गवई यांचे घर जळून घरातील सामान जळून खाक झाले. तेव्हा या आगीमुळे परिसरातील जनता संभ्रमात पडली आहे. नेमके आगीचे कारण समजू शकले नाही. यावेळी वणी व बळेगाव येथे अकोट ग्रामीण पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच तलाठी झटाले, तलाठी रतन यांनी पंचनामे करून अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :fireआगAkola Ruralअकोला ग्रामीण