युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:13 IST2019-10-14T18:13:36+5:302019-10-14T18:13:41+5:30

युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Attack on youth with sharp weapon | युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या छाया हॉस्पिटलसमोर एका युवकावर दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
डाबकी रोडवरील छाया हॉस्पिटल समोर असलेल्या रवी आॅटो गॅरेजमध्ये विक्की जगताप रा. बाळापूर नाका हा काम करतो. यावेळी जगताप याच्यावर दोन युवकांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी जखमीला उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. या प्रकरणी आरोपीविरोधात डाबकी रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय नफाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: Attack on youth with sharp weapon