अकोला येथे आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धा-२0१५

By Admin | Updated: February 19, 2015 00:07 IST2015-02-19T00:07:34+5:302015-02-19T00:07:34+5:30

अकोला, औरंगाबाद, धारणी, किनवट, कळमनुरी संघाची आघाडी.

Ashram School Divisional Games Competition -2015 in Akola | अकोला येथे आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धा-२0१५

अकोला येथे आश्रमशाळा विभागीय क्रीडा स्पर्धा-२0१५

अकोला: वसंत देसाई क्रीडांगण येथे बुधवारपासून सुरू झालेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली. सायंकाळपर्यंत झालेल्या या फेरीत अकोला, औरंगाबाद, धारणी, किनवट, कळमनुरी संघांनी आघाडी घेतली. स्पर्धेत १९ व १५ वर्षाआतील मुले व मुली सहभागी झाले आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
१९ वर्षाआतील मुलांच्या गटात कबड्डी स्पर्धेत, अकोला व पांढरकवडा संघाने आघाडी घेतली आहे. खो-खो स्पर्धेतील उपान्त्य फेरीतील सामने झाले असून, धारणी आणि अकोला संघाने अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली. उपान्त्य फेरीतील सामन्यामध्ये अकोला संघाने औरंगाबाद तर धारणी संघाने किनवट संघावर मात केली. व्हॉलीबॉलमध्ये किनवट, धारणी, औरंगाबाद संघाने आघाडी घेतली आहे. १९ वर्षाआतील मुलींच्या गटात कबड्डीमध्ये धारणी आणि पांढरकवडा संघात झालेल्या सामन्यात धारणी संघाने विजय मिळविला. अकोला संघाचा प्रतिस्पर्धी संघ मैदानात हजर झाला नसल्याने पुढे चाल देण्यात आली. खो-खो मध्ये अकोला, किनवट, कळमनुरी व धारणी संघाने उपान्त्यफेरीत प्रवेश निश्‍चित केला आहे. व्हॉलीबॉलमध्ये किनवट, औरंगाबाद, कळमनुरी, धारणी संघाने सवरेत्तम खेळप्रदर्शन करीत उपान्त्य फेरीत दाखल झाला.

Web Title: Ashram School Divisional Games Competition -2015 in Akola