शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी ‘आशा ’स्वयंसेविका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 13:42 IST

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी आशा स्वयंसेविका राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर गरोदर मातांच्या मदतीसाठी आशा स्वयंसेविका राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली असून, गरोदर महिला मतदारांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आशा स्वयंसेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदान पथकांसोबत आशा स्वयंसेविका थांबणार असून, गरोदर महिला मतदारांना मदत करणार आहेत. मतदान केंद्रांवर रुग्णवाहिकादेखील तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जनसंपर्क अधिकारी शाहू भगत व प्रकाश गवळी उपस्थित होते.जिल्ह्यात ७०८० गरोदर महिला!जिल्ह्यात ७ हजार ८० गरोदर महिला असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांनी दिली.जिल्हा परिषदेत परिसर स्वच्छता उपक्रम!जिल्हा परिषदेत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही सीईओ आयुष प्रसाद यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019akola-pcअकोला