शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तूर्तास ‘एएमटी’ सुरू राहील!

By admin | Updated: August 3, 2014 00:21 IST

शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट रद्द करून शहरवासीयांसाठी नवीन चार वाहनांची तात्पुरती व्यवस्था उभारण्याची महापालिकेची गर्जना हवेत विरली आहे.

अकोला : शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट रद्द करून शहरवासीयांसाठी नवीन चार वाहनांची तात्पुरती व्यवस्था उभारण्याची महापालिकेची गर्जना हवेत विरली आहे. ३ ऑगस्ट रोजी शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट संपुष्टात येत असल्याने व नवीन वाहनांची पर्यायी व्यवस्था न झाल्याने अखेर मनपाने भंगार झालेल्या दहा ह्यएएमटीह्णबस स्वत:च चालविण्याचा निर्णय २ ऑगस्ट रोजी घेतला. याकरिता मनपात कार्यरत ४0 चालक-वाहकांची बस सेवेसाठी नियुक्ती करण्यात आली. महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेनेच्या क ार्यकाळात प्रशासनाने शहर बस वाहतुकीचा कंत्राट सहकारी तत्त्वावर अकोला प्रवासी व मालवाहतूक संस्थेला दिला होता. करारानुसार मनपा व चालक-वाहकांचे वेतन देण्यास संस्थेला अपयश येऊन संस्था डबघाईस आली. २३ ह्यएएमटीह्ण बसपैकी रस्त्यावर केवळ सात बस धावत असून, परवान्याचे नूतनीकरण न केल्यामुळे तीन बस उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे जमा आहेत. एकूणच परिस्थिती पाहता, ३ ऑगस्टपासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय संबंधित संस्थेने घेतला होता. त्यापूर्वी भंगार बसमधून अकोलेकरांची वाहतूक जीवघेणी असून, अपघात घडल्यास सर्वप्रथम आयुक्त व महापौर यांच्यावर फौजदारी दाखल होईल, ही सबब पुढे करीत प्रशासनाने हा कंत्राट रद्द करण्याचा प्रस्ताव १८ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मांडला होता. कंत्राट रद्द केल्यास अकोलेकरांची गैरसोय होईल, ती टाळण्यासाठी चार नवीन वाहनांची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश सभेत महापौर ज्योत्स्ना गवई यांनी दिले होते. तर मुंबई येथील एक कंपनी बस वाहतुकीसाठी इच्छुक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. यादरम्यान, शहर बस वाहतूक सेवेचा कंत्राट देण्यासाठी प्रशासनाने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता, लवकरच नवीन बस सेवा सुरू करण्याचे दिवास्वप्न अकोलेकरांना दाखवले. अवघ्या तीनच दिवसात प्रशासनाचे पाय जमिनीवर आले. तूर्तास रस्त्यावर धावणार्‍या सात बसेस व ह्यआरटीओह्णकडे जमा असलेल्या तीन बसेस अशा एकूण दहा ह्यएएमटीह्ण बसेस मनपाने स्वत: चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता २0 चालक व २0 वाहकांच्या नियुक्तीचे आदेश २ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले.

** उद्या रंगीत तालीम

मनपामध्ये ४४ चालक कार्यरत आहेत. यापैकी २0 चालकांची शहर बस वाहतुकीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच २0 कर्मचार्‍यांची वाहक म्हणून निवड करण्यात आली. शहरातील प्रमुख तीन मार्गांवर सदर बसेस धावतील. याकरिता ३ ऑगस्ट रोजी रंगीत तालीम होईल. तर मनपाचे विभाग प्रमुख यांना बसगाड्या व प्रवाशांची तिकीट तपासण्याचा तात्पुरता अधिकार देण्यात आला आहे.

** जीवघेण्या वाहतुकीवर तोडगाच नाही!

शहरातील सर्व बसेस भंगार झाल्या असून, त्यांचा कधीही अपघात होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. ही बाब समोर ठेवूनच प्रशासनाने हा कंत्राट रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु नवीन बस उपलब्ध न झाल्याने प्रशासनाने पुन्हा याच भंगार बसचा पर्याय निवडला. अर्थातच, प्रशासनाला अकोलेकरांच्या जीवाची काडीचीही किंमत नाही, हे स्पष्ट होत आहे.

** निविदा काढव्याच लागतील

शहर बस वाहतूक सेवेसाठी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रशासनाने निविदा काढल्यास प्रक्रिया पूर्ण करून बस रस्त्यावर धावण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.