शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’अभियान, उत्पन्नाच्या स्रोतासह सभेचे कामकाज सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:51 IST

अकाेला: ‘अमृत’अभियानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या याेजनांची वर्तमानस्थिती, अदा केलेले देयक, मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत, तसेच गतवर्षभरातील सर्वसाधारण सभेतील कामकाजाचा इत्थंभूत ...

अकाेला: ‘अमृत’अभियानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या याेजनांची वर्तमानस्थिती, अदा केलेले देयक, मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत, तसेच गतवर्षभरातील सर्वसाधारण सभेतील कामकाजाचा इत्थंभूत गाेषवारा सादर करण्याचे नगर विकास विभागाचे पत्र महापालिकेत धडकताच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे सदर पत्र प्राप्त हाेताच माहिती संकलीत करताना मनपाची धांदल उडाली आहे.

केंद्र शासनाने ‘अमृत’अभियान अंतर्गत भूमिगत गटार याेजना, पाणी पुरवठा याेजना निकाली काढली जात आहे. उपराेक्त निधीतून विकास कामांची स्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. या व्यतिरिक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीची माहिती सादर करण्याचीही सूचना आहे. केंद्र व राज्य शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी काेट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तरीही शहरांमधील अस्वच्छतेची समस्या कायमच असल्याचे चित्र दिसून येते. घनकचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाकडून काेणत्या उपाययाेजना केल्या जात आहेत, यासंदर्भात माहिती सादर करावी लागणार आहे. शहरात काेट्यवधींच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांचे अवघ्या सहा महिन्यात पितळ उघडे पडले. याबद्दल सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश आहेत.

नगररचना विभागावर करडी नजर

नगररचना विभागातील अंदाधुंद कारभाराची दखल घेत शासनाने या विभागामार्फत वाणिज्य संकुल,रहिवासी सदनिका (अपार्टमेंट)तसेच आजवर मंजूर केलेल्या ले-आऊटची सर्व माहिती सादर करण्याचे सूचित केले आहे. मागील काही दिवसांपासून मनपाच्या नगररचना विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगणमत करून काही बांधकाम व्यावसायिक व नगरसेवकांनी मनमानी कारभार चालविल्याचा आराेप आहे.

शासनाने मागितले सभेचे इतिवृत्त

महापालिकेत २०१४ पासून भाजप सत्तास्थानी आहे. काही सभांंमध्ये सत्तापक्ष चर्चा न करताच विषय सूचीवरील विषयांना मंजुरी देत असल्याचा शिवसेनेचा आक्षेप आहे. शिवसेनेने राज्य शासनाकडे २ जुलै, २९ सप्टेंबर व ३० ऑक्टाेबर राेजीच्या सर्वसाधारण सभेची तक्रार केली आहे. त्यामुळे सभेत मंजूर केलेले विषय व त्याचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

!