शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरविरोधी लढ्यात अकोल्याचे हॉस्पिटल महत्वाचे ठरेल - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 12:48 IST

अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.

अकोला : उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक कॅन्सर रुग्ण महाराष्ट्रात असून, रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेल्या लढा कौतुकास्पद आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचविण्यास रिलायन्सने प्राधान्य दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून, हे हॉस्पिटल कॅन्सरविरोधी लढ्यात महत्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे काढले.रिलायन्स समुहाने येथून जवळच असलेल्या रिधोरा येथे उभारलेल्या कॅन्सर उपचार केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. रिलायन्सचे ग्रामीण भागातील हे पहिले कॅन्सर उपचार केंद्र आहे. उद्घाटन सोहळ्याला रिलायन्स हॉस्पीटलच्या चेयरपर्सन टीना अंबानी, राज्याचे वित्तमंत्री सुधिर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की राज्यात कोट्यवधी लोकांच्या तपासणी करण्यात आल्या असून, त्यामध्ये १० टक्के लोकांमध्ये कॅन्सर आढळून आला. त्यांचे पुन्हा स्क्रिनिंग करण्यात आले. कॅन्सर हा सर्वाधिक जीवघेणा आजार असून, त्याला पराभूत करण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूमुळे होणार तोंडाचा कॅन्सर हा सर्वाधिक तरुणांमध्ये आढळून येतो. रिलायन्सने कॅन्सरविरोधी उभारलेला लढा कौतुकास्पद आहे. रिलायन्समुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशात कॅन्सर हॉस्पिटलचे ग्रीड तयार होत आहे. जगातील सर्वात आधूनिक असे तंत्रज्ञान रिलायन्समुळे ग्रामीण भागात पोहचले आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

टॅग्स :AkolaअकोलाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRelianceरिलायन्स