शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची सूत्रे अंजलीताई यांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:12 IST

अकोल्यातील प्रचाराची सूत्रे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हातात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला व सोलापूर या दोन्ही मतदारसंघांत उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने त्यांना या दोन मतदारसंघांसह राज्यभरातील ‘वंचित’च्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार असल्याने अकोल्यातील प्रचाराची सूत्रे प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हातात राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रचारासाठी एक कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला असून, त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून ‘वंचित’ची रणनीती ठरणार असल्याचे समजते.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ओसरलेली मोदी लाट अन् बहुजनांच्या मतांवर ‘वंचित’ची भिस्त असून, ओबीसीमधील लहान समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांची ताकद एकत्र करण्याची गणिते मांडली जात आहेत. वर्षभरापूर्वीच प्रा. अंजलीतार्इंनी अकोल्यातील सूत्रे हातात घेऊन जिल्हा पिंजून काढला होता. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी मतदारांसोबतचा संपर्क कायम ठेवला असल्याने ‘वंचित’ची धुरा त्या समर्थपणे सांभाळतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. खुद्द बाळासाहेब आंबेडकर प्रचारातील महत्त्वाच्या टप्यांवर स्वत: मतदारांच्या संपर्कात राहतील, असेही नियोजन केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरakola-pcअकोला