शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘एसडीओ’ कार्यालयात आवक-जावक ‘ऑनलाईन’!

By admin | Updated: January 3, 2015 00:53 IST

पत्रव्यवहाराची ऑनलाईन नोंद: विभागातील पहिला प्रयोग.

संतोष येलकर/अकोलाअकोल्याच्या उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात आवक-जावक प्रणाली विकसीत करण्यात आली असून, या प्रणालीव्दारे कार्यालयात प्राप्त होणार्‍या तक्रारी आणि निवेदनांची नोंद ह्यऑनलाईन ह्ण केली जात आहे. ह्यएसडीओह्ण कार्यालयातील पत्रव्यवहार ऑनलाईन करण्याचा हा प्रयोग अमरावती विभागात पहिल्यांदाच सुरु करण्यात आला आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालयात महसूलविषयक कामांबाबत नागरिकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी तसेच निवेदने प्राप्त होतात. या तक्रारी, अर्ज व निवेदनाच्या पत्रव्यवहाराची नोंद कार्यालयातील रजिस्टरमध्ये लिहून केली जाते; परंतू कार्यालयात प्राप्त होणार्‍या पत्रव्यवहारावर तातडीने आवश्यक ती कारवाई करुन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी अकोला उपविभागीय कार्यालयात ह्यआवक-जावक ह्यप्रणाली विकसीत करण्यात आली. त्यानुसार आता ह्यएसडीओ ह्ण कार्यालयात प्राप्त होणारे अर्ज, तक्रारी व निवेदनांची नोंद आता संगणकावर ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे. या प्रणालीव्दारे पत्रव्यवहार ऑनलाईन पध्दतीने कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांकडे आवश्यक त्या कारवाईसाठी पाठविला जात आहे. तसेच प्राप्त पत्रव्यवहारावर केलेल्या कारवाईची माहितीदेखील ऑनलाईन पध्दतीनेच वरिष्ठ वरिष्ठ अधिकारी व संबंधितांना दिली जाते. एसडीओ कार्यालयात होणारा पत्रव्यवहार आणि त्यावर करण्यात आलेल्या कारवाईची नोंद आवक-जावक प्रणालीव्दारे ऑनलाईन करण्याचा प्रयोग नवीन वर्षापासून सुरु करण्यात आला. प्राप्त पत्रव्यवहारावर करावयाच्या कारवाईचा आढावा दर आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी स्पष्ट केले. *दर आठवड्यात कारवाईचा आढावा!आवक-जावक प्रणालीव्दारे एसडीओ कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारी,अर्ज, निवेदने आणि प्राप्त पत्रव्यवहारावर करण्यात आलेल्या कारवाईचा दर आठवड्यात उपविभागीय अधिकार्‍यांकडून आढावा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राप्त प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणे आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेण्यात येणार आहे.*नवीन वर्षापासून नवा प्रयोग!नववर्षाचे औचित्य साधून, अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात १ जानेवारीपासून कार्यालयातील पत्रव्यवहार ह्यआवक-जावक प्रणालीव्दारे ह्ण ऑनलाईन करण्याचा नवा प्रयोग सुरु करण्यात आला.