अकोला जिमखाना क्रिकेट संघ रवाना

By Admin | Updated: May 23, 2014 00:11 IST2014-05-22T23:42:27+5:302014-05-23T00:11:48+5:30

विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शरद भाके क्रिकेट अकादमीच्यावतीने १३ वर्षाखालील टी-थर्टी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अकोला जिमखाना क्रिकेट क्लब संघ सहभागी

Akola Gymkhana Cricket team leaves | अकोला जिमखाना क्रिकेट संघ रवाना

अकोला जिमखाना क्रिकेट संघ रवाना

अकोला : विदर्भ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शरद भाके क्रिकेट अकादमीच्यावतीने १३ वर्षाखालील टी-थर्टी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अकोला जिमखाना क्रिकेट क्लब संघ सहभागी होत असून, गुरुवार, २२ मे रोजी नागपूरला रवाना झाला.
स्पर्धेत विदर्भातील १६ दिग्गज संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा लीग पद्धतीने होणार असून, प्रत्येक संघाचे तीन सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नियम आणि अटी व्हीसीए नियमावलीनुसार राहणार आहेत. अकोला जिमखाना संघाचे सामने २३, २४ आणि २५ मे रोजी होणार असल्याचे क्लबचे अध्यक्ष तथा रणजीपटू संतोष देशमुख यांनी सांगितले.
जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या निवड चाचणीनंतर अकोला संघ घोषित करण्यात आला. कर्णधारपदी समीर डोईफोडे तर उपकर्णधारपदी गणेश भोसले याची निवड करण्यात आली. संघात आकाश राऊत, सयाजी देशमुख, प्रेम विंचनकर, विश्व चव्हाण, मितेश भारूका, क्रांती अलोणे, आदित्य गव्हाळे, श्यामल निखाडे, अभिजित सदाफळे, अथर्व गडकरी, श्रेयश राऊत, ऋषिकेश भारसाकळे, मल्हार देशपांडे, प्रशिक्षक संतोष देशमुख यांचा समावेश आहे. संघाला गब्बर शर्मा, रमेश सावरकर, संजय चन्नकेशला, रवी चिरडे, अशोक शर्मा, संजीव शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. 

Web Title: Akola Gymkhana Cricket team leaves