शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
2
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
3
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
5
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
6
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
7
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
8
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
9
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
10
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
11
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
12
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
13
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
14
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
15
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
16
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
17
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
18
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
19
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
20
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान

By admin | Updated: June 21, 2014 01:28 IST

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान; मतदार यादीत घोळ

अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्ह्यात ६५.९0 टक्के मतदान झाले. मात्र नाव नोंदणी केल्यानंतरही अकोला शहरातील चार केंद्रांत मतदार यादीत नावच नसल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील १७ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले आहे. उमेदवारांमध्ये विमाशिचे आमदार वसंतराव खोटरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड. अरुण शेळके, शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे, काँग्रेस शिक्षक सेल व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश तायडे, बहुजन माध्यमिक शिक्षक संघाचे डॉ. संतोष हुशे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे श्रीकृष्ण अवचार, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ डायगव्हाणे गटाचे रामदास बारोटे, इन्शाचे सुभाष गवई, शिक्षक भारतीच्या वर्षा निकम, विदर्भ जनसंग्राम शिक्षक संघटनेचे शेखर भोयर, अजमल युसूफ खान, गुलाम अहमद अमानुल्ला खान, जयदीप देशमुख, नरहरी अर्डक, विजय गुल्हाने आणि सर्जेराव देशमुख यांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातील ११ केंद्रांत मतदान पार प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत गुरुजींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकोला शहरातील विद्या मंदिर शाळा व सीताबाई कला महाविद्यालय, बाश्रीटाकळी-पंचायत समिती, आकोट - तहसील कार्यालय, बाळापूर - पंचायत समिती, पातूर - तहसील कार्यालय आणि मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयात मतदानाची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, अकोल्यातील विद्या मंदिर येथील मतदान केंद्रातून अनेक शिक्षकांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदान न करताच परत जावे लागले. पुरवणी यादीच मतदान केंद्रात आली नसल्याचा दावा उमेदवारांच्या सर्मथकांनी केला.