शहिदी स्मृती फुटबॉल स्पर्धेत अकोला बॉईज विजेता

By Admin | Updated: June 26, 2014 02:07 IST2014-06-25T20:51:00+5:302014-06-26T02:07:18+5:30

नाईन-ए-साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अकोला बॉईजचे शानदार प्रदर्शन

Akola Boyz winner in Shahidi Smruti Football tournament | शहिदी स्मृती फुटबॉल स्पर्धेत अकोला बॉईज विजेता

शहिदी स्मृती फुटबॉल स्पर्धेत अकोला बॉईज विजेता

अकोला : सय्यद मोहसिन अली शहिदी स्मृतिप्रीत्यर्थ यंग ब्लड फुटबॉल असोसिएशनच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे नाईन-ए-साईड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात अकोला बॉईजने शानदार प्रदर्शन करीत आयोजक यंग ब्लड क्लबवर टायब्रेकरमध्ये ५-४ ने विजय मिळविला.
सामन्याच्या निर्धारित क्षणापर्यंत दोन्ही संघाची शून्यगोल बरोबरी होती. टायब्रेकरमध्ये हा सामना अकोला बॉईजने जिंकला. स्पर्धा २० ते २४ जून या कालावधीत घेण्यात आली. शहरातील आठ नामांकित संघांसह वाशिम व भुसावळ संघ यामध्ये सहभागी झाले होते. यंग ब्लड, अकोला बॉईज आणि उस्मान आझाद संघांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. पंच म्हणून अजहर अहमद, अन्सार अहमद यांनी काम पाहिले. अंतिम सामन्यात नावेद खान यांनी पंच म्हणून काम पाहिले. उपान्त्य फेरीत अकोला बॉईजने उस्मान आझादचा तर यंग ब्लडने वाशिम संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. विजेता संघातील सर्व खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र देण्यात आले. बेस्ट प्लेअरचा पुरस्कार अकोला बॉईजचा राजीक सुलतान अली व यंग ब्लडचा शेख शाहरूख यांना देण्यात आला.

 
 

Web Title: Akola Boyz winner in Shahidi Smruti Football tournament