औरंगाबादच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाची अकोला एसीबी कार्यालयात हजेरी

By Admin | Updated: February 18, 2015 01:23 IST2015-02-18T01:23:28+5:302015-02-18T01:23:28+5:30

शेगाव येथील लाचप्रकरण; अधिका-यांनी केला प्रश्नांचा भडीमार.

Akola ACB office of Aurangabad bribery police inspector arrives at the office | औरंगाबादच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाची अकोला एसीबी कार्यालयात हजेरी

औरंगाबादच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाची अकोला एसीबी कार्यालयात हजेरी

अकोला: पाच लाख रूपयांची लाच स्विकारणारे औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी अवधूत ठाकरे यांनी न्यायालयाच्या अटीनुसार मंगळवारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कार्यालयात हजेरी लावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी यावेळी ठाकरे यांची चौकशी केली.
औरंगाबाद येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांना पाच लाख रूपयांची लाच स्विकारताना ६ फेब्रूवारी रोजी शेगाव येथे रंगेहात पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा रायटर भीमराव जाधव यानेही एसीबीसमोर शरणागती पत्करली. दोघांनाही न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केले होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी ठाकरे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी चौकशीसाठी त्यांना काही प्रश्नांची उत्तरं विचारली. २७ नोव्हेंबर २0१४ रोजी तक्रारकर्ता शेख शफी यांना साखरखेर्डा येथून ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी घेतली होती? चिखली येथील हॉटेलमध्ये तीन रूम बुक केल्याची माहिती वरिष्ठांना दिली होती? तसेच शेगाव दौरा शासकीय होता की खासगी? दौरा शासकीय होता तर मुख्यालय सोडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? शेगावला आल्यानंतर सोबत पोलीस कर्मचारी होते का? शफी यांना ताब्यात घेतल्यानंतर साखरखेर्डा पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती का? प्रकाश काळे यांच्या बँक खात्यात जमा केलेला १ लाख १0 हजार रूपयांचा धनादेश कोठून आला? हा धनादेश कुणी बँकेत जमा केला? असे अनेक प्रश्न ठाकरे यांना विचारण्यात आले.

Web Title: Akola ACB office of Aurangabad bribery police inspector arrives at the office