शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात आढळल्या ‘एडिस एजिप्टा’च्या अळ्य़ा

By admin | Updated: September 28, 2014 01:46 IST

डेंग्यूचा कहर; अकोला महापालिका प्रशासन मात्र झोपेत.

अकोला : तुंबलेली गटारे, सर्व्हिस लाईनमधील घाण-कचर्‍याने गच्च भरलेल्या नाल्या जैसे थे असल्याने शहरात साथ रोगांचा उद्रेक झाला आहे. मनपातील हिवताप विभागाला डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजाराच्या (एडीस एजिप्टाय) अळ्य़ा आढळल्या आहेत. अकोलेकरांचा जीव डेंग्यू, कावीळ व हिवतापाच्या साथीमुळे धोक्यात असताना मनपाच्या आरोग्य यंत्रणेने झोपेचे सोंग घेतले असून, आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी मनपाच्या आरोग्य यंत्रणेची आहे; परंतु आजरोजी शहरातील अस्वच्छतेने गाठलेला कळस पाहता, मनपाला कर्तव्याचा विसर पडल्याचे दिसून येते. परिणामी मुख्य रस्त्यांसह प्रभागातील रस्ते, मोठे नाले, सर्व्हिस लाईनमध्ये प्रचंड घाण व कचर्‍याचे ढीग साचले आहेत. खुल्या भूखंडांवर पाण्याची डबकी साचली असून, साफसफाई होत नसल्याने नाल्यांमधील पाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे शहरात साथ रोगांचा झपाट्याने फैलाव झाला असून जीवघेण्या कावीळ, डेंग्यू, हिवतापाच्या आजाराने थैमान घातले आहे. अशास्थितीत हिवताप विभागाला एडिस एजिप्टायच्या अळ्य़ा आढळून आल्या आहेत. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले असून, त्यावर उपचार करताना नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. डेंग्यूसदृश रुग्णाला रक्ताऐवजी ह्यप्लेटलेटह्णची आवश्यक ता असते. यामुळे रक्तदात्यांचा शोध घेताना नाकीनऊ येत आहेत. मनपाचा स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, साथरोग अधिकारी, हिवताप अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असताना आयुक्त कल्याणकर त्यांना पाठीशी घालत आहेत.