शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

कृषि विद्यापीठाचे ‘मॉडेल’ जलस्त्रोत कोरडेच !

By admin | Updated: July 28, 2014 01:55 IST

कृषी विद्यापीठातील सर्वच तलाव कोरडे; ‘मॉडेल’ जलस्त्रोतही नावालाच उरलेत.

अकोला: यंदा पश्‍चिम विदर्भात पूरक पाऊस नसल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सर्वच तलाव कोरडे असून, जलस्रोत बळकटीकरणातंर्गत कोट्यवधी रू पये खर्चून तयार करण्यात आलेले ह्यमॉडेलह्ण जलस्त्रोतही नावालाच उरले आहेत. विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ाचा मोठय़ा प्रमाणात उपसा झाल्यामुळे भूजलाची उपलब्धता अत्यंत कमी झाली आहे. पूर्वी ओलित असलेल्या भागातही कोरडवाहू परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषगांने भूजल संपत्तीची उपलब्धता व भविष्यातील नियोजन महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने अकोला येथील मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर पथदश्री प्रकल्प तयार केला आहे. त्यासाठी १.९५ कि.मी. नाला रुंदीकरण करू न २ ते २.५ मीटर खोलीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता ५ पट जास्त, म्हणजे ६0 हजार घनमीटर असल्याचा दावा कृषी विद्यापीठाने केला होता; तथापि, यावर्षी पाऊस पुरेसा नसल्याने हे मॉडेल नावापुरतेच उरले आहे. भूजल साठय़ात ५ पट वाढ झाल्यामुळे परिसरातील सर्व नाले स्थानिक परिस्थितीप्रमाणे रुंद करू न २ ते ३ मीटरपर्यंत खोल केल्यास भूजल विकास होऊ शकेल. या उपाययोजनांची अंमलबजावणी मोठय़ा प्रमाणात झाल्यास, विदर्भातील भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यासाठी त्या फायदेशीर ठरणार असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जलस्त्रोत बळकटीकरणातंर्गत पथदर्श प्रकल्प राबविण्यात आला असून, गेल्यावर्षी या प्रकल्पामुळे भूजल साठय़ात पाच पटीने वाढ झाली होती; परंतु यावर्षी पूरक पाऊस नसल्याने परिस्थिती बिकट झाली असल्याचे जल व मृद अभियांत्रिकी विभागाचे डॉ. सुभाष टाले यांनी स्पष्ट केले.