कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आता प्रवेश बंद आंदोलन

By Admin | Updated: July 12, 2014 01:54 IST2014-07-12T01:44:39+5:302014-07-12T01:54:40+5:30

अकोला येथे कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी कृषी विद्यापीठाचे प्रवेशद्वार बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला.

Agitating shutdown movement of agricultural university employees now | कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आता प्रवेश बंद आंदोलन

कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचे आता प्रवेश बंद आंदोलन

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी कृषी विद्यापीठाचे प्रवेशद्वार बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर शेती कामासाठी लावलेले खासगी ट्रॅक्टर या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी बंद पाडले.
रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २५ जूनपासून संपावर गेले आहेत. या कामबंद आंदोलनामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रावरील मशागतीची कामे ठप्प पडली आहेत. विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात घाण साचली आहे. पशू संवर्धन विभाग व प्रत्येक विभागातील गुरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे अकोला येथील मध्यवर्ती संशोधन विभाग व वणी रंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन क्षेत्रावरील जवळपास साडेतीन हजार हेक्टरवरील मशागतीची कामे ठप्प पडली आहेत.

Web Title: Agitating shutdown movement of agricultural university employees now