शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेनंतरही प्रशासन झोपेतच!

By admin | Updated: May 30, 2017 02:05 IST

लोहारा येथील दरड कोसळून मजुराचे मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा: येथील मन नदीपात्रात अवैध उत्खनन करण्यासाठी तयार केलेली दरड कोसळल्याने १ मजूर ठार तर १ गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. या प्रकरणाला महसूल विभागाने गांभीर्याने घेतले नसल्याचे २९ मे रोजी दिसून आले. घटनास्थळाला एकाही अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने पुन्हा त्याच स्थळावरून रेतीचे उत्खनन करण्यात आले. लोहारा शिवारातील मन नदीच्या पात्रालगतच्या राम अवतारसिंह सिंघेल यांच्या मालकीचा गट नं ८०१ या शेताच्या मन नदी काठावरील भागात भूभाग खोदून रेती भरत असताना दरड कोसळून गोकुळ कैलास नराळे रा. मानेगाव हा मजूर ठार झाला होता, तर एक मजूर जखमी झाला होता. या घटनेतील जखमी चौधरी यांच्यावर अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तो सध्या धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदर गुन्हा हा उरळ पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळपर्यंत एकही अधिकाऱ्याने घटनास्थळावर किंवा मृतकाच्या घरी भेट दिली नाही. त्यामुळे दुपारपासून पुन्हा रेतीची वाहने त्याच स्थळावरून रेती उचल करीत असल्याचे दिसून आले. परवानगी दीड फुटाची; खोदले ३० फूट रेती घाटात दीड फूट खोदण्याची परवानगी असताना अनेक ठिकाणी २० ते ३० फूट खोल कोदकाम करून रेतीची वाहतूक केल्या जात आहे. असाच प्रकार लोहारा येथील रेती घाटावर झालेला आहे. येथे एक फूट ७.५ इंच खोलपर्यंत खोदण्याची परवानगी असताना या भागात २० ते ३० फुटापर्यंत खोदकाम करण्यात आले आहे. बुलडाणा येथील अमित काळकर या कंत्राटदाराने आतापर्यंत हजारो ब्रास रेतीची वाहतूक केलेली आहे. तर सदर रेती घाटावर मोठमोठे खड्डेही करून ठेवले आहे. याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याने मजुराच्या मृत्यूला तेही जबाबदार आहेत. घटनास्थळ हे महसुली भाग क्रमांक १ मध्ये येत असून, त्या स्थळाची हरासी झालेली आहे. रेती उचल करण्याची जागा लांबी ५५८ मीटर, रुंदी ९ मीटर तर खोल ०.५० मीटरचा परवाना देण्यात आलेला आहे.- डी.पी. पुंडे, तहसीलदार, बाळापूर