आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार रकमेत वाढ

By Admin | Updated: February 18, 2015 01:25 IST2015-02-18T01:25:01+5:302015-02-18T01:25:01+5:30

२0१२-१३ पासून मिळणार वाढीव रक्कम.

Adult teachers award award increase | आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार रकमेत वाढ

आदर्श शिक्षकांच्या पुरस्कार रकमेत वाढ

अकोला- राज्यातील आदर्श शिक्षकांना राज्य शासनातर्फे दरवर्षी पुरस्कार दिले जातात. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना १0 हजार रुपये रोख पुरस्कार दिला जात होती. या रक्कमेत वाढ करून २५ हजार रुपये रोख देण्याचा निर्णय राज्य शासनाने १६ फेब्रुवारी रोजी घेतला. २0१२-१३ पासून आदर्श शिक्षक पुरस्कारांना ही वाढीव रक्कम मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासोबतच त्यांचा सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी आणि समाजाचे काही देणे आहे या भावनेतून वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्‍या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनातर्फे पुरस्कार दिला जातो. यात पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या आदर्श शिक्षकांचा समावेश असतो. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना २१ ऑक्टोबर २0१0 पासून १0 हजार रुपये रोख पुरस्कार दिला जात होता. आता या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. २0१२-१३ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळविणार्‍या शिक्षकांची नावे १0 सप्टेंबर २0१३ रोजी घोषित करण्यात आली. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांनाही आता २५ हजार रुपये रोख पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला.

*फरकाची रक्कम मिळणार
पुरस्कार प्राप्त शिक्षकांना १0 हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली आहे. त्यांना आता पुरस्काराच्या फरकाची रक्कम दिली जाणार आहे. त्यानुसार पुरस्कार प्राप्त शिक्षकांना प्रत्येकी १५ हजार रुपये तर विभागून पुरस्कार मिळविणार्‍या शिक्षकांना प्रत्येकी २0 हजार रुपये फरकाची रक्कम दिली जाईल.

Web Title: Adult teachers award award increase