शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

...अन् ७० वर्षांच्या अन्नपूर्णाबाई गहिवरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 16:53 IST

Murtijapur News : तहसीलदारांनी तात्पुरती मदत केली तेव्हा ७० वर्षांच्या अन्नपूर्णाबाईंनी गहिवरून आपली कहाणी सांगितली. 

-संजय उमकमूर्तिजापूर : तालुक्यातील फणी गावात एकटीच म्हातारी राहत असून 'फणी गावावर ७० वर्षांच्या म्हातारीचे अधिराज्य' या शिरषकाखाली बुधवारी 'लोकमत'ने बातमी प्रकाशीत करताच बातमीची दखल घेऊन प्रशासन तातडीने फणी गावात दाखल झाले. म्हातारीला भेटून तहसीलदारांनी तात्पुरती मदत केली तेव्हा ७० वर्षांच्या अन्नपूर्णाबाईंनी गहिवरून आपली कहाणी सांगितली.         काही वर्षांपूर्वी फणी गावाची दोनशेच्यावर लोकवस्ती होती, कालांतराने हळूहळू लोकांनी आपले गाव सोडले. २०११ च्या जनगणनेनुसार त्या गावात ३५ लोक राहत असल्याची नोंद आहे. परंतू प्रत्यक्षात फणी गावात एकटीच म्हातारी राहत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे घर पावसाने क्षतिग्रस्त झाले असून बाजुच्या किणी गावात गुरांच्या गोठ्यात तिने आश्रय घेतला आहे. धानोरा वैद्य, किणी, फणी या तीन गावांमिळून धानोरा गट ग्रामपंचायत आहे. विशेष म्हणजे सरपंच फणी या गावच्या असून त्याही मूर्तिजापूर येथे राहत असल्याचे वास्तव समोर आले आहे. परंतू या गावात मोजके घरे उभे असले तरी ती घरे अडगळीत पडलेली आहेत, दरम्यान तहसीलदार प्रदीप पवार यांनी या गावात भेट दिली असता घराच्या आजूबाजूला असलेले गवत काढून आम्ही इथेच राहत असल्या आव संरपंचानी आणला.           तहसीलदार प्रदीप यांनी सहानुभूतीपूर्वक आस्थेने आजीबाईची विचारपूस करुन तिला तिला धिर देत, दोन - तीन महिने पुरेल एवढे अन्नधान्य व इतर साहित्य देवून आरोग्याची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदतही केली. 

लोकमतने प्रकाशित केलेल्या बातमीमुळे हा प्रकार उघडकीस आला. बातमी वाचून आम्ही त्या गावात पोहोचलो, तेव्हा त्या गावात सध्या कोणीच राहत नाही, म्हातारीसाठी श्रावणबाळ योजनेत तरतूद, अन्नपुरवठा योजने अंतर्गत धान्य व घरकुलासाठी प्रयत्न करुन तिची आर्थिक व राहण्याची समस्या लवकरच पूर्ण करणार आहे.-प्रदीप पवार, तहसीलदार, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला