शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक रिंगणातील ५६ उमेदवारांवर गुन्हे

By admin | Updated: February 18, 2017 02:37 IST

सर्वच पक्षांचा समावेश; अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधीक.

अकोला, दि. १७- महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहचला असून, सर्वच उमेदवार आपण कसे स्वच्छ प्रतिमेचे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत. परंतु, निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या एकूण ५७९ उमेदवारांपैकी ५६ उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे, या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून समोर आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याबद्दल प्रत्येक जण दुसर्‍याकडे बोट दाखवत असला, तरी सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसं, संभाजी ब्रिगेड, समाजवादी पक्ष, एमआयएम, रिपाइं, बहुजन मुक्ती मोर्चा आदी पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवार उभे आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करून वैयक्तिक माहिती सादर करावी लागते. यामध्ये शिक्षण, स्थावर व जंगम मालमत्ता, कर्ज व गुन्हे दाखल आहेत का, आदी माहितीचा समावेश असतो. महापालिकेच्या निवडणुकीसाठी २0 प्रभागांतून ८0 जागांसाठी ५७९ उमेदवार उभे आहेत. या उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, यापैकी ५६ उमेदवारांविरुद्ध दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा होऊ शकेल, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी अनेक उमेदवारांविरुद्ध राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत, तर काहींवर गंभीर गुन्हे आहेत. दोषसिद्धी झाल्यास त्यांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा होऊ शकते. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक १0 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये १२ अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ, काँग्रेसचे पाच, भारिपचे सहा, मनसे, संभाजी ब्रिगेड व इतर प्रत्येकी एक असा क्रम लागतो.५९ उमेदवार कोट्यधीशनिवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी ५९ उमेदवारांची संपत्ती १ ते १८ कोटीपर्यंत आहे, तर ५४ उमेदवारांची संपत्ती ५0 लाखांपेक्षा अधिक असल्याचे प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. कोट्यधीश उमेदवारांमध्ये सर्वाधिक १४ उमेदवार भाजपचे आहेत. त्यानंतर शिवसेना १२, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष प्रत्येकी नऊ, भारिप-बमसं चार, मनसे आणि संभाजी ब्रिगेड प्रत्येकी एक, असा क्रम आहे. रिंगणातील २४ उमेदवारांवर थकीत कर्ज असल्याचेही समोर आले आहे.