शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर पंचायत समितीत अधिकारी, कर्मचा-यांची १७ पदे रिक्त

By admin | Updated: December 10, 2014 01:29 IST

शिक्षण विस्तार अधिका-याअभावी शिक्षणाचा खेळखंडोबा : शाखा अभियंता प्रतिनियुक्तीवर.

दीपक अग्रवाल / मूर्तिजापूर (अकोला)पंचायत राज व्यवस्थेत महत्त्वाचा घटक मानल्या जाणार्‍या पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची सर्व पदे भरलेली असणे कामकाज सुरळीतपणे होण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. परंतु, मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची तब्बल १७ पदे रिक्त अहेत. त्याचा विकासकामांना फटका बसत आहे.पंचायत राज व्यवस्थेत तालुक्याच्या विकासाची जबाबदारी पंचायत समितीकडे देण्यात आलेली आहे. मूर्तिजापूर पंचायत समितीमध्य अधिकारी व कर्मचार्‍यांचे २४ संवर्ग असून, ७३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५६ पदे भरलेली आहेत; परंतु चार संवर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्तीवर अन्यत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पंचायत समितीमध्ये प्रत्यक्ष कार्यरत मनुष्यबळ ५२ एवढेच आहे. ५६ पदे भरलेली असल्यामुळे १७ पदे रिक्त आहेत. पंचायत समितीमधील प्रतिनियुक्तीवर गेलेले कर्मचारी व रिक्त पदांचा परिणाम तालुक्याच्या विकासकामांवर होत आहे. पंचायत समितीमधील मंजूर एकूण ७३ पदांपैकी ५६ पदे भरण्यात आली असल्यामुळे १७ पदे रिक्त असल्याचे दिसत असले तरी नेमकी महत्त्वाची पदेच रिक्त आहेत, हे उल्लेखनीय आहे. यात कृषी अधिकारी, शाखा अभियंता, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ सहायक आदी पदांचा समावेश आहे. त्याचा पंचायत समिती अंतर्गत करण्यात येणार्‍या विकासकामांवर विपरीत परिणाम होत आहे.