शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र

By admin | Updated: July 31, 2014 02:08 IST

अकोला जिल्ह्यातील तीन प्रकरणे पात्र; तीन प्रकरणात फेरचौकशीचे निर्देश.

अकोला: शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदत देण्याबाबत बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत शेतकरी आत्महत्यांची तीन प्रकरणे मदतीसाठीपात्र ठरविण्यात आली असून, १२ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली तर उर्वरित तीन प्रकरणांमध्ये फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांच्या एकूण १८ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.त्यापैकी आकोट तालुक्यातील जळगाव नहाटे येथील गजानन श्रीराम गावंडे, बाळापूर तालुक्यातल्या कळंबा येथील रामभाऊ तुळशीराम उगले आणि पातूर तालुक्यातल्या देऊळगाव येथील विष्णू विश्राम कराळे इत्यादी तीन शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली तर शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये सुधाकर भास्कर कुळकर्णी (वरुड बु.), दौलत जागोजी तेलगोटे (कान्हेरी गवळी),अंबादास श्रीराम सावंग (धामणा), पुरुषोत्तम मोतीराम पुंडकर (तांदळी खुर्द), सुनील यशवंत ढोके (कोठारी बु.), विष्णू सीताराम इंगळे (दिग्रस खुर्द), महेंद्र शिवदास गवई (उमरा), वासुदेव सुखदेव दंदी (रिधोरा), देवेंद्र पुंडलिक इंगळे (वाडेगाव), संदीप कैलास सिरसाट (कुपटा), मिलिंद डिगांबर इंगळे (सोनगिरी) व अमोल गौतम धांडे (कवठा) इत्यादी शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे. उर्वरित तीन शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले.जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा परिषद कृषी सभापती रामदास मालवे यांच्यासह कृषी विभाग, जिल्हा उपनिबंधक, पोलिस व अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.