शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

साखळी ओढून रेल्वे थांबविणा-या १00 प्रवाशांना एकाच वेळी अटक

By admin | Updated: September 19, 2014 00:46 IST

रेल्वे पोलिसांनी शेगाव येथे रेल्वे कायदा कलम १४७ नुसार केली कारवाई.

शेगाव : दर गुरुवारी गजानन महाराज मंदिराजवळ रेल्वे थांबविण्यासाठी साखळी ओढून, रेल्वे रुळ ओलांडणार्‍या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्‍यांनी गुरूवारी कारवाई केली. एकाच वेळी १00 पेक्षा जास्त प्रवाशांना अटक करुन, रेल्वे पोलिसांनी त्यांच्या विरुध्द कारवाई केली.शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भक्त मोठय़ा प्रमाणात येतात. गुरूवारी भक्तांची गर्दी जास्त असते. रेल्वेने दर गुरूवारी नियमित शेगाव वारी करणार्‍या भक्तांची संख्याही थोडीथोडकी नाही. शेगावच्या रेल्वे स्टेशनवरून मंदिर थोडे लांब आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या गजानन महाराज मंदिराजवळ थांबतील, अशा बेताने साखळी ओढून थांबविल्या जातात. गजानन भक्त त्यांच्या सोयीसाठी हा गैरप्रकार करीत असले तरी, त्याचा फायदा या परिसरातील इतर प्रवाशांनाही होते; मात्र साखळी ओढल्यानंतर मंदिराजवळ रेल्वे १0 मिनिटे त्याच ठिकाणी थांबते. शिवाय तीच गाडी पुन्हा शेगाव रेल्वे स्थानकावरही थांबते. या प्रकाराची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेत, या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी रेल्वे सुरक्षा बलाने कारवाईची तयारी केली होती. चारमोरी परिसरात नागपूर - भुसावळ पॅसेंजर प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे गेटजवळ थांबवताच, या गाडीतून उतरणार्‍या व रेल्वेचे नियम मोडणार्‍या १00 पेक्षा जास्त प्रवाशांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांची ही कारवाई सायंकाळपर्यंंत सुरु च होती. अटक करण्यात आलेल्या प्रवाशांवर रेल्वे कायदा कलम १४७ नुसार कारवाई करण्यात आली.