जामखेडमध्ये बैलगाडीसह आंदोलन रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 10:53 AM2018-08-09T10:53:06+5:302018-08-09T10:53:10+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध गावांतून बीडरोड, नगररोड, छत्रपती शिवाजी पेठ, तपनेश्वर रस्ता या मार्गावरून पंधरा ते वीस बैलगाडीमरार्ठा समाज बांधव या आंदोलनात झाले आहेत.

Movement along the bullock cart in Jamkhed | जामखेडमध्ये बैलगाडीसह आंदोलन रस्त्यावर

जामखेडमध्ये बैलगाडीसह आंदोलन रस्त्यावर

googlenewsNext

जामखेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तालुक्याच्या विविध गावांतून बीडरोड, नगररोड, छत्रपती शिवाजी पेठ, तपनेश्वर रस्ता या मार्गावरून पंधरा ते वीस बैलगाडीमरार्ठा समाज बांधव या आंदोलनात झाले आहेत.
खर्डा चौकात एक स्टेज उभारण्यात आले आहे. या स्टेजवरून विद्यार्थी, कार्यकर्ते आरक्षणाबाबत भूमिका मांडत आहेत. शहरामध्ये आज दिवसभर सांस्कृतिक, जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्व वाहतूक एसटी सेवा, मालट्रक, रिक्षा, टेम्पो, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बाजार बंद ठेवण्यात आला असून नागरिक आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. तालुक्यातील नान्नज, जवळा, खर्डा, अरणगांव, साकत, हळगाव, पिंपरखेड, पाटोदा यासह संपूर्ण तालुका बंदमध्ये सहभागी झाला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी दंगलीचे प्रात्यक्षिक करून व संचलन करून कोणत्याही परिस्थितीला सज्ज असल्याचे दाखवून दिले.

Web Title: Movement along the bullock cart in Jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.