शहरं
Join us  
Trending Stories
1
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
2
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
3
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
4
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
5
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
6
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
7
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
8
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
9
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
10
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
11
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
12
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
14
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
15
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
16
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
17
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
18
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
19
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
20
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

coronavirus: मंदिरे बंद असल्याने हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट, कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 5:45 AM

Coronavirus Unlock News : मंदिर बंद असल्याने दरमहा शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या साईनगरीच्या अर्थकारणाचे चाक पुरते रूतले आहे. हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून दीड-दोन लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर : लॉकडाऊनमध्ये मोठी मंदिरे बंद असल्याने त्यांच्यावर अवलंबून असलेले दुकानदार, त्यांच्या कुटुंबीयांच्या रोजीरोटीचा प्रश्न बिकट झाला आहे. शिर्डी, शिंगणापूर, मढी, मोहटादेवी, ज्ञानेश्वर मंदिर अशा मोठ्या मंदिर संस्थानांची आर्थिक घडी विस्कटली आहे.दरमहा शेकडो कोटींची उलाढाल करणाऱ्या साईनगरीच्या अर्थकारणाचे चाक पुरते रूतले आहे. हजारो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला असून दीड-दोन लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभावित झाले आहेत. साईनगरीत लहान-मोठे साडेसातशे लॉजिंग-हॉटेल्स, दोनशे ट्रॅव्हल्स व्यावसायिक, अडीचशे खासगी बसेस, पाचशेवर हार-फुले, लॉकेट व मूर्तींची दुकाने, एक हजाराहून अधिक खासगी जीप-कार वाहतूकदार, शेकडो फूल विक्रेते व फूल उत्पादक शेतकरी मंदिरावरच अवलंबून आहेत.  

मंदिरे खुली करा; आरतीला परवानगी द्या!    सोलापूर : महाराष्ट्रातील मोठ्या देवस्थानापासून  सर्व मंदिरे खुली करून कीर्तन, भजन व काकड आरती करण्यासाठी नियम व अटी घालून परवानगी द्यावी, अशी मागणी भाविक वारकरी मंडळाने केली आहे़  या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या गेटसमोर भजन आंदोलन करण्यात आले. परवानगी मिळाली नाही तर आम्ही मुंबई येथील आझाद मैदानावर पुढचे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती ह़ भ़ प़ सुधाकर इंगळे महाराज यांनी दिली़ 

शिर्डीत गेल्या पुण्यतिथी उत्सवात ४ कोटी देणगी मिळाली ती यंदा केवळ ३८ लाखांवर आली. श्रीक्षेत्र मढी ( ता. पाथर्डी ) येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थानमध्ये पुजारी, वाहनचालक, आचारी, सुरक्षारक्षक असे मिळून १८ कर्मचारी आहेत. प्रतिमहिना सव्वा कोटींची आर्थिक उलाढाल असलेली ही बाजारपेठ अक्षरश: थंडावली आहे.  

राज्यातील इतर तीर्थक्षेत्रातील व्यवसायांची स्थितीही नाजूक झाली आहे. मंदिरेच बंद असल्याने भाविकांचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. 

शिर्डीत हॉटेल, लॉजिंग व्यवसायात जवळपास पंधरा हजार कोटींची गुंतवणूक आहे. मंदिर बंदमुळे हा व्यवसाय पूर्ण बंद आहे. वीज बिल, कर्जाचे हप्ते, विविध कर, कर्मचाऱ्यांचे पगार अशा बाबी पूर्णत: आवाक्याबाहेर गेल्या आहेत.- अभय शेळके, अध्यक्ष, हॉटेल असोसिएशनमंदिर बंद असल्याने दानपेटीचा ओघ जवळजवळ बंदच आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणारी थोडीफार देणगी व बँकातील ठेवींच्या व्याजावरच सध्या संस्थानचा गाडा सुरू आहे. - कान्हुराज बगाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMaharashtraमहाराष्ट्र