अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 08:09 AM2024-05-23T08:09:56+5:302024-05-23T08:10:32+5:30

ही घटना १९ मे रोजी सायंकाळी श्रीरामपूर शहरात घडली. मुलाने बुधवारी फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली. त्याने फिर्यादीत म्हटले की, सावंत व त्याच्या साथीदारांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल याने माझे कपडे काढून लायटरने चटके दिले.

A minor boy was tied to a tree and beaten up, an incident in Srirampur A case has been registered against four | अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : मोटारसायकल चोरीचा आरोप करत तरुणांनी पळवून नेले. झाडाला बांधून चटके दिले व मारहाण केल्याची फिर्याद १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने शहर पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अमोल सावंतसह चौघांवर गुन्हा दाखल केला. 

ही घटना १९ मे रोजी सायंकाळी श्रीरामपूर शहरात घडली. मुलाने बुधवारी फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली. त्याने फिर्यादीत म्हटले की, सावंत व त्याच्या साथीदारांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अमोल याने माझे कपडे काढून लायटरने चटके दिले.

चटके नव्हे, मारहाण 
अल्पवयीन मुलावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुलाच्या पाठीवर, तसेच पार्श्वभागावर मारहाणीचे वळ उमटलेले होते, असे साखर कामगार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

फिर्यादी झाला आरोपी
ज्या अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण झाली, त्याने यापूर्वी शहरात टीव्ही, मोटारसायकल चोरली आहे. या चोरीची मुलाने कबुली दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अल्पवयीन मुलाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
Web Title: A minor boy was tied to a tree and beaten up, an incident in Srirampur A case has been registered against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.