शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी एकत्र येत बुजविले रस्त्यावरील खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण मेखणी मार्गे राजापूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मेखणी वस्तीवरील ...

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण मेखणी मार्गे राजापूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मेखणी वस्तीवरील तरुणांनी एकत्र येत श्रमदानातून मुरूमाने खड्डे बुजविले.

देवदैठण मेखणीमार्गे राजापूर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सातत्याने सुरू असते. कॉलनीपासून मेखणी वस्तीच्या दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचून मोठमोठे खड्डे पडले होते. देवदैठणच्या मेखणी वस्तीवरील तरुणांनी एकत्र येऊन खड्डे बुजविण्याचा विचार मांडला व तत्काळ त्याची अंमलबजावणी केली.

वैजनाथ वाघमारे, संतोष जयसिंग वाघमारे, रोहिदास वाघमारे, महेंद्र बबन वाघमारे, संतोष तान्हाजी वाघमारे, प्रशांत वाघमारे या टॅक्टर मालकांनी स्वतःचे ट्रॅक्टर घेऊन दोन किमी अंतरातील खड्ड्यात विनामोबदला मुरूम टाकला. तसेच माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य अमोल वाघमारे, डॉ. भाऊसाहेब जाधव, मच्छिंद्र गुंजाळ, मेजर मच्छिंद्र वाघमारे, शिवाजी वाघमारे, तुषार वाघमारे, सचिन लोखंडे, प्रतिराज मेडिकलचे प्रतीक वाघमारे यांनी काही रक्कम जमा करून मुरूम भरण्यासाठी लावलेल्या जेसीबीसाठी ती रक्कम खर्च केली. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणे सुलभ होणार आहे. तरुण एकत्र आल्याने मोठे सामाजिक कार्य पार पडू शकते याचे ते उत्तम उदाहरण आहे.

----

लोखंडे, बनकर यांनी बुजविले खड्डे

देवदैठण-पाडळी रस्त्यावर साकळाई मळा परिसरात पावसाने पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून मार्ग काढणे अवघड झाले होते. अनेक वाहनांचे यामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे उद्योजक अतुल लोखंडे व गणेश बनकर यांनी स्वखर्चातून साकळाई मळ्याजवळील खड्डे मुरमाने बुजविले आहेत.

-----

२३ देवदैठण

देवदैठण येथील तरुणांनी एकत्र येऊन कॉलनी ते मेखणी रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे मुरुमाने बुजविले. (छायाचित्र - संदीप घावटे)

230721\img_20210723_142447.jpg

देवदैठण येथील मेखणीतील तरुणांनी एकत्र येत राजापूर रस्त्यावरील खड्डे मुरमाने बुजवले . ( छायाचित्र संदीप घावटे )