शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरातील शिक्षकांचे कार्य राज्याला दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST

संगमनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पुढाकारातून चंदनापुरी येथील सिंधू लॉन्समध्ये विविध ...

संगमनेर पंचायत समितीचा शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेच्या संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या पुढाकारातून चंदनापुरी येथील सिंधू लॉन्समध्ये विविध सुविधायुक्त कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. येथे ५०३ रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी परतले. त्यासाठी विशेष योगदान देणाऱ्यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून सन्मान करत शनिवारी (दि. २०) या सेंटरचा समारोप करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. तांबे बोलत होते. लॉन्स मोफत उपलब्ध करून देणारे सिंधू लॉन्सचे संचालक नरेंद्र रहाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख इंद्रजीत थोरात, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, महिला व बालकल्याण सभापती मीरा शेटे, सदस्य मिलिंद कानवडे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, सदस्य अशोक सातपुते, विष्णुपंत राहटळ, तहसीलदार अमोल निकम, तालुका आरोग्य अधिकारी सुरेश घोलप, गटशिक्षण अधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण विस्तार अधिकारी के. के. पवार, आर. पी. रहाणे, चंदनापुरीचे सरपंच शंकर रहाणे, उपसरपंच भाऊराव रहाणे, प्रा‌थमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुल देशमुख, महिला काँग्रेस अध्यक्ष अर्चना बालोडे, सोमनाथ गुंजाळ, संतोष मांडेकर, विजय रहाणे, सुवर्णा फटांगरे, कैलास धोत्रे, दशरथ धाडवड, प्रभाकर रोकडे, शिवनाथ पारधी, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष राजू रहाणे, भाऊराव राहिंज, सोमनाथ मदने, अशोक शेटे आदी यावेळी उपस्थित होते.