शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सराफांची संपातून माघार

By admin | Updated: April 26, 2016 23:24 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़

अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़ सराफ व्यावसायिकांसाठी लग्नसराई ही मोठी संधी असते़ यंदा मात्र, लग्नसराईच्या काळात तब्बल ४२ दिवस दुकाने बंद राहिल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले़ आता एप्रिल महिन्याच्या अखेर लग्नसराई संपत आहे़ पुढे मुहूर्त नसल्याने येते चार दिवसच व्यवसायाची चांगली संधी असल्याने बहुतांशी सराफांनी मंगळवारी दुकाने उघडली़ सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने दि. १३ एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. सरकारने मात्र, अबकारी कायद्याबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले होते. २७ एप्रिलपर्यंत हा बंद राहणार होता. नगरच्या सराफांनी मात्र, एक दिवस संप पाळून दुकाने उघडली़ (प्रतिनिधी)दीड महिन्यांचा संप करूनही केंद्र सरकारने सराफांच्या मागण्या मान्य न केल्याने संघटनेने पुन्हा तीन दिवसांचा संप पुकारला आहे़ हा संप २७ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे़ नगरमधील मात्र, काही सराफांनी आपली दुकाने उघडून व्यवसाय केला़ हे खेदजनक आहे़ ही लढाई संघटनेची नसून सर्वच सराफ व्यावसायिकांची आहे़ त्यामुळे सराफांनी संघटनेला साथ देणे गरजेचे आहे़ -सुभाष मुथा, राज्य उपाध्यक्ष, सराफ संघटना