शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक,लातूर,औरंगाबाद,पुणे संघाकडून विजयी सलामी

By admin | Updated: December 22, 2015 23:11 IST

शेवगाव : शेवगाव येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या १६ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या नाशिक व लातूर तर मुलींच्या औरंगाबाद, लातूर व पुणे संघाने विजयी सलामी दिली

शेवगाव : शेवगाव येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या १६ वर्षे वयोगटातील मुले-मुलींच्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलांच्या नाशिक व लातूर तर मुलींच्या औरंगाबाद, लातूर व पुणे संघाने विजयी सलामी दिली.मुलांच्या नाशिक व औरंगाबाद विभागीय संघात पार पडलेल्या शुभारंभाच्या सामन्यात नाशिक संघाने औरंगाबादच्या संघावर ५ गुणांनी विजय मिळविला. नाशिक संघातील वनराज जाधव याने २.२० मी. पळती केली. तर विजय गांगार्डे याने ४.२० मी. नाबाद पळती केली. आकाश शिंदे याने ४ गडी बाद केले. औरंगाबाद संघातील कृष्णा ढवळे याने २.२० मी. पळती करून २ गडी बाद केले. लातूर व मुंबईच्या संघात प्रत्येकी १५ समान गुण होऊन बरोबरी झाल्याने जादा डाव घेण्यात आला. त्यात लातूर संघाने १ गुण व २.४० मी. राखून निर्णायक विजय मिळविला. विकास लंजीले याने १.२० मी. तसेच ३ मी. पळती करून ५ गडी टिपले. शिवशंकर गंडेदर याने १.४० मी. व १.२० मी. पळती केली. आकाश भोसले याने २.२० मी. व १.१० मी. पळती करून ७ गडी बाद करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली.मुलींच्या लातूर व मुंबई संघात रंगलेल्या सामन्यात लातूरच्या संघाने एक डाव व ६ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. ऋतुजा चव्हाणने ६ मी. व ४.२० मी. पळती करून ४ गडी टिपले. अक्षदा कुलकर्णीने ३ गडी बाद करण्यात यश मिळविले. मुंबईच्या संघातील नमीता मुळे हिने १.३० मी. पळती करून २ गडी बाद करण्यात यश मिळविले. औरंगाबाद व नागपूर संघात रंगलेल्या सामन्यात औरंगाबाद संघाने नागपूर संघावर १ डाव व ३ गुणांनी मात केली. मनिषा पवार नाबाद ३.२० मि. पळती, शितल प्रभाले व वर्षा चव्हाण प्रत्येकी २.५० मी. पळती, मुमताज शेख हिने ४ गडी बाद करण्यात यश मिळविले. नागपूर संघातून रेश्मा नखाते १.३० मी. व पूनम लांजेवाल २.४० मी. पळती करून क्रीडा रसिकांचे लक्ष वेधले. पुणे व अमरावती संघातील लक्षणीय सामन्यात यजमान पुणे विभागीय संघाने एक डाव १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला.शेवगावच्या अरुंधती वांढेकर हिने २ मी. पळती करून २ गडी बाद करण्यात यश मिळविले. सायली ढोले व निशिगंधा घाडगे या महिला खेळाडूंनी प्रत्येकी ३.३० मी. पळती करून उपस्थित क्रीडा रसिकांची वाहवा मिळविली. अमरावती संघातील अमृता जाधवने १.३० मी. पळती केली.(तालुका प्रतिनिधी)