शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचे फलक हटविण्याचा आदेश कुणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:23 IST

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक हटविल्यावरून महापालिकेत पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत प्रशासनाकडे विचारणा होऊ ...

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फलक हटविल्यावरून महापालिकेत पडद्याआडून जोरदार हालचाली सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांकडून कारवाईबाबत प्रशासनाकडे विचारणा होऊ लागली असून, प्रशासनाने मात्र अजून तोंड उघडलेले नाही. त्यामुळे मोदी यांच्या फलकावरील गूढ आणखी वाढले आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकावर कारवाई केली. लसीकरण केंद्राबाहेर लावलेले फलक पथकाने हटविले. प्रशासनाच्या या कारवाईवरून महापालिकेत कमालीची अस्वस्थता आहे. भाजपच्याच जाहिरात फलकांवरच कारवाई का, असा सवाल भाजपकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता आहे. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही सत्तेत सहभागी आहेत. महापौर पद सेनेकडे आहे. राज्यात सेना व भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी नगरमध्ये मात्र य दोन्ही पक्षांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. त्यात अंतर पडणार नाही, याची काळजी सेना व भाजपकडून घेतली जात आहे. असे असताना पालिकेकडून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या जाहिरात फलकावर कारवाई केली गेली. त्यामुळे भाजपमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्यात पालिकेत सत्तांतर झाल्यानंतरची प्रशासनाची ही पहिलीच कारवाई आहे. प्रशासनाची ही कारवाई सेना व भाजपमधील दरी निर्माण करणारी आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत पदाधिकाऱ्यांकडून विचारणा होऊ लागली आहे. परंतु, प्रशासनाकडून तक्रारदाराचे नाव उघड केले गेले नाही. त्यामुळे या कारवाईचे गूढ आणखी वाढले असून, भाजप याबाबत काय भूमिका घेते, याबाबत उत्सुकता आहे.

....

शहरातील ४९३ जाहिरात फलक अधिकृत

महापालिकेने शहरातील ४९३ जाहिरात फलकांना परवानगी दिली आहे. उर्वरित फलक अनधिकृत असून, या फलकांवर पालिकेकडून कारवाई केली गेली नाही. यामध्ये बहुतांश फलक हे राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. राजकीय पक्षांच्या फलकांवर कारवाई करण्याचे धाडस महापालिकेचे अधिकारी दाखवित नाहीत. मग भाजपचेच फलक असे अचानक कसे काढले गेले. त्यामागे कुणाचा हात आहे का, यासह अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.