शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डीप्रकरणी लढा चालूच ठेवू

By admin | Updated: July 19, 2016 00:05 IST

कर्जत : कोपर्डीची घटना दिल्लीपेक्षा भयानक आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत लढा चालूच ठेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोपर्डी ग्रामस्थांना दिली.

कर्जत : कोपर्डीची घटना दिल्लीपेक्षा भयानक आहे. या प्रश्नाची तड लागेपर्यंत लढा चालूच ठेवू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी कोपर्डी ग्रामस्थांना दिली.सोमवारी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे विखे यांनी सांत्वन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. हा प्रश्न हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तपास दिरंगाईने सुरू होता. जनतेच्या रेट्यामुळे त्याचा वेग वाढला. दिल्लीपेक्षा ही घटना भयानक असताना ग्रामस्थांनी मोठा संयम दाखविला. या प्रकरणात आम्ही शेवटपर्यंत मदत करणार आहे.यावेळी विखे यांच्यासोबत भाऊसाहेब कांबळे, अण्णासाहेब शेलार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, जगन्नाथ राळेभात, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी आदी हजर होते. शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी पीडित कुटुंबास १ लाख रुपयांची तर बीडच्या प्रायव्हेट क्लास संघटनेतर्फे प्रा. श्रीराम चौभारे यांनी १ लाख ११ हजार रूपयांची आर्थिक मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)मुंडे, मेटे कोपर्डीत४विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार डॉ. सुधीर तांबे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, प्रदेश सरचिटणीस अनुराधा नागवडे, निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, माजी आमदार रश्मी बागल, शिवसेनेचे उपनेते रमेश खाडे, डॉ. सुजय विखे, काँग्रेसचे कर्जत तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, मिनाक्षी साळुंके आदी मान्यवरांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले.