शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

भुतवडा तलावात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:19 IST

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जामखेडचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. चार मे ते पंधरा जून या कालावधीत तलावातील चार लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. सध्या तलावातील पाणी गढूळ असल्याने तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहराला सध्या होणाऱ्या पंधरा दिवसांपासूनच्या पाणीपुरवठ्यातून शहरवासीयांची सुटका होणार आहे. गुरुवारी तलावातील पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे. भुतवडा तलाव तीन महिन्यापूर्वी कोरडा पडला होता. तलावात चाळीस टक्के गाळ असल्याने पाणीसाठा कमी होत होता. गेल्या ४५ वर्षात तलावातील गाळ काढला नव्हता. तलावातील गाळ काढण्यासाठी नगराध्यक्षा प्रीती राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, शिवसेना नेते मधुकर राळेभात, नगरसेवकांनी बैठक घेऊन लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी निधी गोळा करून काम तातडीने सुरवात करण्याची ग्वाही दिली. माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी याकामी पुढाकार घेतला. नगरपरिषदेचे दहा लाख, पुणे महापौर व नगरसेवकांचे पंधरा लाख व शिवसेना जामखेड शाखेने एक लाखाची मदत तातडीने देऊन सहा पोकलॅन मशीन व ३५० ट्रॅक्टरच्या मदतीने अहोरात्र गाळ काढण्यासाठी ४ मे पासून प्रत्यक्षात सुरवात झाली. तलावासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राम शिंदे, पुण्याचे महापौर संतोष जगताप, विश्वदर्शन व पत्रकार संघ, नगरसेवक तसेच अनेक दात्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला. तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढल्याने सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. चार ते पाच महिन्यांपासून शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता जलवाहिनीद्वारे जामखेडमधील प्रत्येक गल्लीत पाणी मिळण्यासाठी पंधरा दिवस लागत असे. दुष्काळी परिस्थितीत शहरवासीयांना पाणी विकत घ्यावे लागले तसेच गाळ काढण्यासाठी घरोघर फिरुन मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)