नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:11+5:302021-07-24T04:14:11+5:30

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी (टोल फ्री १०७७ किंवा ०२४१२३२३८४४, २३५६९४०) संपर्क साधावा, ...

Warning to the citizens of the riverside villages | नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाशी (टोल फ्री १०७७ किंवा ०२४१२३२३८४४, २३५६९४०) संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. दि.२३ जुलै रोजी सकाळी १० वाजता अहमदनगर जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ८०७ क्युसेक व भीमा नदीस दौंड पूल येथे ५२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन नदीपात्रातील विसर्गातही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे, तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र, तसेच ओढे व नाले यापासून दूर राहावे, घाट रस्त्याने प्रवास करणे शक्यतो टाळावे. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Warning to the citizens of the riverside villages