निघोज : वडनेर बुद्रूक (ता. पारनेर) येथे राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आदर्शवत आहेत, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काढले.
वडनेर बुद्रूक येथे नुकतीच भोसले यांच्यासह गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी प्रकाश लाळगे यांनी भेट दिली होती. यावेळी ते बोलत होते. कोरोनाबाबत उपाययोजना, लसीकरणातही आघाडी हे सर्वांच्या समन्वयातून शक्य होते, असे भोसले यावेळी म्हणाले.
सरपंच राहुल सुकाळे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन वडनेर बुद्रूक पुन्हा एकदा विकासकामांसह स्वच्छतेच्या जोरावर राज्याच्या नकाशावर झळकवणार आहे.
यावेळी उपसरपंच पूनम खुपटे, सैनिक बँकेचे उपाध्यक्ष शिवाजी सुकाळे, माजी सरपंच पांडुरंग येवले, स्वाती नऱ्हे, माजी उपसरपंच रमेश वाजे, शाळा समिती अध्यक्ष शिवा पवार, संतोष चौधरी, अनिल नऱ्हे, माउली वाजे, विवेक वाजे, अरूण नऱ्हे, शुभम नऱ्हे, सुदाम येवले, दत्ता वाजे, डॉ. प्रवीण नरसाळे, आरोग्य सेविका शेख यांसह स्वयंसेवक उपस्थित होते.
----
२३ वडनेर बुद्रूक
वडनेर बुद्रूक येथे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी किशोर माने आदींनी भेट दिली.