ग्रामस्थांनी वाळूतस्करांना चोपले

By Admin | Updated: July 8, 2014 00:31 IST2014-07-07T23:38:16+5:302014-07-08T00:31:46+5:30

कोपरगाव : विहिरीजवळ वाळूउपसा होत असल्याच्या कारणावरून धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात ग्रामस्थ व वाळूतस्करांमध्ये धुमश्चक्री उडाली़

The villagers chased the sandwiches | ग्रामस्थांनी वाळूतस्करांना चोपले

ग्रामस्थांनी वाळूतस्करांना चोपले

कोपरगाव : विहिरीजवळ वाळूउपसा होत असल्याच्या कारणावरून धारणगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात ग्रामस्थ व वाळूतस्करांमध्ये धुमश्चक्री उडाली़ यात ट्रॅक्टर ट्रॉली व तीन मोटारसायकली जाळण्यात आल्या़ ही घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली़
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोविंद वहाडणे हे गोदापात्रात असलेल्या विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी रविवारी रात्री दहाच्या सुमारास गेले़ तेव्हा विहिरीजवळ अवैध वाळूउपसा होत असल्याचे त्यांनी पाहिले़ विहिरीजवळ वाळू भरू नका, असे त्यांनी तस्करांना सांगितले़ याचा राग येऊन तस्करांनी वहाडणे यांना मारहाण केली़ ही घटना धारणगावच्या ग्रामस्थांना समजताच शेकडो ग्रामस्थ गोदावरी पात्रात आले़ यावेळी ग्रामस्थ व वाळूतस्करांमध्ये हाणामारी झाली़
वाळूतस्करांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला़ नदीपात्रात शेतकऱ्यांच्या असलेल्या विहिरींवरील मोटारींचे तसेच पाईपची मोडतोड वाळूतस्करांनी केली़ त्यावर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वाळू तस्करांच्या मोटारसायकली व ट्रॅक्टर ट्रॉली पेटवून दिला़ यात वहाडणे यांचीही मोटारसायकल जळाली़
दरम्यान, गोविंद वहाडणे यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बाळासाहेब कदम, बाळासाहेब चतूर, सोपान चिने व इतर पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The villagers chased the sandwiches