शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा एकर वांग्यातून कमावले दोन लाख

By admin | Updated: June 24, 2016 01:19 IST

मुंबई येथील बंदरात आयुष्यभर हमाली केल्यानंतर सूर्यभान भाऊसाहेब गवारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे साडेसहा एकर शेती घेतली़ सेवानिवृत्तीनंतर

मुंबई येथील बंदरात आयुष्यभर हमाली केल्यानंतर सूर्यभान भाऊसाहेब गवारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे साडेसहा एकर शेती घेतली़ सेवानिवृत्तीनंतर ते या शेतीत रमले़ या शेतीत एप्रिल महिन्यात गवारे यांनी अर्धा एकर वांग्याची लागवड केली़ ३० गुंठे क्षेत्रात अवघ्या तीन महिन्यात गवारे यांनी तब्बल दोन लाखाचे उत्पन्न मिळविण्याची किमया साधली़सूर्यभान गवारे यांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील अस्तगाव़ पण सततच्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून कुकडीच्या पाण्याचा अंदाज घेत गवारे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे साडेसहा एकर शेती दहा वर्षापूर्वी खरेदी केली़ पण दुष्काळामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला अन् शेतीचा निर्णय चुकल्याची खंत सतावू लागली़ गवारे यांचा मुलगा संदीप हा पोलीस झाला़ संदीपने आई-वडिलांचा उत्साह वाढविण्यासाठी गेल्या वर्षी ३० गुंठे जागेत शेततळे तयार केले़ या शेततळ्यात पाणी साठविले़ या पाण्यामुळे सूर्यभान यांनी पत्नी रंजना, सून जयश्री यांच्या मदतीने वांग्याचे पीक घेतले़ या शेततळ्याच्या पाण्यावर एक एकर डाळिंब जगविले़तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ दारकुंडे, शेतीतज्ज्ञ रमेश हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली गवारे यांनी ३० गुंठे क्षेत्रात एप्रिल महिन्यात वांग्याची लागवड केली़ ठिबक सिंचनाचा वापर करुन पाणी बचत साधली़ शेणखताचा वापर करुन रासायनिक खतांचा वापर टाळला़ त्यामुळे खतांवरील खर्च कमी झाला़ दोन महिन्यानंतर वांगे निघण्यास सुरुवात झाली़ ३० ते ४० रुपये किलो दराने वांग्याला बाजारभाव मिळाला़ आत्तापर्यंत एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळाले असून, पुढील तोडणीतून दीड लाख उत्पन्न मिळेल, असा त्यांना विश्वास आहे़ दुष्काळामुळे सर्व शेती तोट्यात असतानाच वांगे पिकाने त्यांना तारले़ त्यामुळे गवारे परिवाराचा उत्साह दुणावला आहे़