शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तेवीस हॉटेलमधील पाणी पिण्यास अयोग्य

By admin | Updated: August 14, 2024 15:44 IST

अहमदनगर: कितीही उपाययोजना केल्या अन् कितीही खबरदारी घेतली तरी काविळीचा फैलाव होणे थांबलेले नाही.

अहमदनगर: कितीही उपाययोजना केल्या अन् कितीही खबरदारी घेतली तरी काविळीचा फैलाव होणे थांबलेले नाही. मंगळवारी काविळीचे आणखी ३२ नवीन रुग्ण आढळले आहेत. शहरातील २३ हॉटेल्समधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याने महापालिकेने संबंधित हॉटेल मालकांना तशा नोटिसा बजावल्या आहेत. हॉटेल्सवर कायदेशीर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभागालाही महापालिकेने पत्र पाठविले आहे. गत महिन्यात शहरात कावीळ, मलेरिया सारखे साथीचे आजार पसरण्यास सुरूवात झाली आहे. शहरात काविळीचे हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. ही साथ रोखण्यासाठी महापालिकेने फिरता दवाखाना सुरू केला आहे. महासभेत त्याचे पडसाद उमटल्यानंतर आरोग्य विभागाने रोजच्या रोज सर्व्हेक्षण सुरू केले. आतापर्यंत २५ हजार ३३० घरांचे सर्व्हेक्षण आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यात ८७९ जणांना कावीळ झाल्याचे समोर आले आहे. त्यातील ५०९ जणांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कागदोपत्री काविळीचा आकडा नऊशेच्या आसपास असला तरी हजारो रुग्ण काविळीने त्रस्त आहेत. मंगळवारी आढळलेल्या ३२ रुग्णांपैंकी १६ जण दवाखान्यात आहेत. साथ रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने हॉटेलची तपासणी सुरू केली. आतापर्यंत ७६ हॉटेलमधील पाणी नमुने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासले. त्यातील २३ हॉटेल्समधील पाणी पिण्यास आयोग्य असल्याचे निदर्शनास आले आहे. क्लोरिनेशन करण्याची सूचना देणारी नोटीस महापालिकेने संबंधित हॉटेलमालकांना बजावली आहे. याशिवाय या हॉटेलवर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र महापालिकेने अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले आहे. (प्रतिनिधी)शहरातील साथ रोगावर आळा घालण्यासाठी एल अ‍ॅण्ड टी कंपनीने महापालिकेला फिरता दवाखाना सुरू करण्यास सहकार्य केले आहे. या मोबाईल हेल्थ क्लिनिकद्वारे मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक औषधोपचार, आजार टाळण्यासाठी आरोग्य शिक्षण व सल्ला डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांकडून दिला जाणार आहे. बोल्हेगाव, सावेडी, मुकुंदनगर येथे हा फिरता दवाखाना असणार आहे. याशिवाय महापालिकेचा फिरता दवाखानाही नगरकरांच्या सेवेत आहे. शहरातील २५ हजार ३३० घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात ३७० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून ५०९ जण प्रथोपचारानंतर घरी गेले. पथकाने शहरातील ७६ हॉटेलमधील पाणी नमुने तपासले. हातगाडीवाल्यांचीही होणार तपासणीशहर व उपनगरात रस्त्याकडेला अनेक हातगाड्यांवरून खाण्याचे पदार्थ विक्री केले जातात. तेथूनही साथ रोग पसरू शकतात. त्यामुळे या हातगाड्यांची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बुधवारपासून इडली विकणाऱ्या हातगाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी दिली.