शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मराठा, ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:20 IST

संगमनेर : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने ...

संगमनेर : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. गुरुवारी (दि. २४) संगमनेर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये जात युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मागणीसंदर्भाने निवेदन दिले.

युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे, शहराध्यक्ष दीपेश ताटकर, सरचिटणीस संतोष गायकवाड, संघटन सरचिटणीस शशांक नामन, कोषाध्यक्ष स्वप्निल लोंढे, शहर सरचिटणीस संतोष गायकवाड, उपाध्यक्ष पोपट घुले, प्रकाश दिघे, हरीश वलवे, संतोष हांडे, ऋषी कांडेकर, गोरक्ष घुगे, योगेश डुबे, सागर कानवडे, अरविंद वाकचौरे, सागर ढेरे, संतोष कोथमिरे, संतोष पठाडे, अक्षय अमृतवाड, विकास जाधव, किरण गुंजाळ, रोहित चौधरी, अरुण थिटमे आदी यावेळी उपस्थित होते.

मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर या दोन्ही समाजांत अस्वस्थता आहे. दोन्ही समाजांना आरक्षण देण्याला महाविकास आघाडी सरकारची उदासीनता समोर आली आहे. त्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा तसेच काही सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने करायला हवा होता, परंतु सरकारने कोणताच निर्णय न केल्याने ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी, पालकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे आरक्षणाचे प्रश्न आणि दुसरीकडे कोरोना संकटामुळे समाजघटकांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक प्रश्नांमुळे अनेक विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून बाजूला जाण्याची भीती आहे.

अशा सर्व परिस्थितीत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने पन्नास टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय करून विद्यार्थी, पालकांना दिलासा दिला. त्याचप्रमाणे राज्य सरकारनेसुद्धा इतर संस्थांना पन्नास टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे निर्देश द्यावेत, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.