शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 27, 2023 13:18 IST

राजूर : धारदार सुऱ्याचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी येथून जवळच असणाऱ्या केळुंगण खांडीतील हॉटेलचा गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला.

राजूर : धारदार सुऱ्याचा धाक दाखवून दोन अज्ञात चोरट्यांनी येथून जवळच असणाऱ्या केळुंगण खांडीतील हॉटेलचा गल्ला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र या चोरट्यांना चुकवत घाबरलेल्या हॉटेल व्यवस्थापकाने बाहेर पळ काढल्यामुळे त्या चोरट्यांनीही धूम ठोकली.याबाबत हिरा हॉटेलचे व्यवस्थापक नामदेव लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले की, दुपारी दोनच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करत माझ्या हॉटेलकडे पळत आले. त्यांनी तोंडाला रूमाल बांधला होता. माझ्या काऊंटरजवळ येत त्यांनी सुरा दाखवत गल्ल्याची चावी मागितली. अचानक सुरा पाहिल्यामुळे घाबरलेल्या व्यवस्थापकाने चावी ठेवली व काऊंटर बाहेर निघाला. याच वेळात व्यवस्थापकाने पुन्हा चावी घेऊन मागील दरवाजाने पळ काढला व तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील, हेडकॉन्स्टेबल सुभाष सोनवणे, राहुल रूपवते व चालक अशोक काळे घटनास्थळाकडे रवाना झाले. दरम्यान पाटील यांनी राजूर येथे नाकाबंदी केली व अकोल्यासही नाकाबंदी बाबत कळविले. व्यवस्थापकाच्या वर्णनावरून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले, त्यांच्याकडे चौकशी केली असता ते रंधा येथील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान पाटील यांच्यासह पथकाने वाकी, शेंडी, वारंघुशी फाटा, बारीपर्यंत पाहणी केली, मात्र या अज्ञात चोरट्यांचा तपास लागला नाही.सध्या तालुक्यात होत असलेल्या चोरीच्या प्रकारामुळे गावोगाव घबराट पसरलेली आहे. परिसरातील अनेक गावातील तरुण रात्रभर गस्त घालत आहेत. पाटील यांनीही रात्रपाळीसाठी पोलिसांची संख्या वाढविली आहे. पोलिसांची दोन वाहने रात्रभर परिसरात गस्त घालत आहेत. कोतूळ फाट्यावर नाकाबंदी केली असून, शेंडी येथेही पोलीस रवाना केल्याचे पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)