पाथरवाला माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:51+5:302021-07-24T04:14:51+5:30

कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वृक्ष भेट देऊन विद्यालय ...

Tree planting on the occasion of Guru Poornima at Patharwala Secondary School | पाथरवाला माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

पाथरवाला माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

कुकाणा : नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वृक्ष भेट देऊन विद्यालय परिसरात वृक्षारोपण केेले.

त्या झाडांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेऊन या विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून विद्यालयातील शिक्षकांना वृक्ष भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ थोरे, मुख्याध्यापक रमेश खाटीक, विक्रम थोरे यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण केले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप थोरे, अध्यापक ईस्माइल शेख, क्रीडाशिक्षक सुनील पंडित, संदीप खाटिक, हरिभाऊ फोपसे, लक्ष्मण थोरे, सागर गवळी, विठ्ठल गवळी, हरिभाऊ फोपसे, जॉन जगदाळे, अध्यापक चंद्रकांत गुंड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

----

२३ कुकाणा १

पाथरवाला माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमानिमित्त वृक्षारोपण करताना शिक्षक आणि विद्यार्थी.

Web Title: Tree planting on the occasion of Guru Poornima at Patharwala Secondary School