साईदीपच्या माध्यमातून अनेकांचे संतती प्राप्तीचे स्वप्न साकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:58+5:302021-08-26T04:23:58+5:30
साईदीप हॉस्पिटलमधील वंध्यत्व निवारण व प्रसूती विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात घुले बोलत होत्या. यावेळी डॉ. अनिलकुमार कुऱ्हाडे, डॉ. ...

साईदीपच्या माध्यमातून अनेकांचे संतती प्राप्तीचे स्वप्न साकार
साईदीप हॉस्पिटलमधील वंध्यत्व निवारण व प्रसूती विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात घुले बोलत होत्या. यावेळी डॉ. अनिलकुमार कुऱ्हाडे, डॉ. व्ही. एन. देशपांडे, डॉ. किरण दीपक, डॉ. इकबाल शेख, डॉ अश्विन झालानी, डॉ.पायल धूत, डॉ. अनिल एकशिंगे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वैशाली किरण म्हणाल्या, मूलबाळ होणारच नाही अशी आशा सोडून दिलेल्या अनेक महिलांचे अल्पदरात स्वप्न साकार करण्यात साईदीप हॉस्पिटल हे एक माध्यम ठरले याचा विशेष आनंद वाटतो. या वाटचालीत डॉ. किशोर नाडकर्णी, डॉ. पूजा नाडकर्णी, डॉ. प्रभाकर सिंग, डॉ. युवराज जडेजा यांचे मोठे योगदान लाभत असल्याचे डॉ. किरण यांनी सांगितले. (वा.प्र.)
....................
फोटो २५ साईदीप
ओळी- साईदीप हॉस्पिटलमधील वंध्यत्व व प्रसूती विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात डॉ. दीपक, जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, डॉ वैशाली किरण, डॉ किरण दीपक, डॉ. कस्तुरी कुऱ्हाडे, डॉ. अनिल कुऱ्हाडे, ज्योती दीपक आदी.