शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्ष झाले, सरकार मला फसवतेय- गांधींच्या समाधीस्थळावरुन हजारे यांचा व्हिडीओ प्रसारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 13:56 IST

लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत.

अहमदनगर : तीन वर्ष झाली भाजप सरकार सत्तेत येऊऩ पण त्यांनी भ्रष्टाचार संपविण्यासाठी एकही निर्णय घेतला नाही. लोकपाल कायदा संसदेतच्या दोन्ही सभागृहात मंजूर होऊनही त्यांनी तो अंमलात आणला नाही. मी वारंवार त्यांना स्मरणपपत्रे लिहित आहे आणि ते मला वारंवार फसवत आहेत. म्हणून मी गांधीजींच्या समाधीसमोर आत्मक्लेश करीत आहे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टीका केली.दिल्ली येथील राजघाटावर गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर हजारे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे़ त्यात ते म्हणतात, काँगे्रसने संसदेच्या दोन्ही सभागृहात लोकपाल कायदा संमत केला़ त्यावेळी भाजप विरोधात होते़ आता तुम्ही सत्तेत आहाता़ त्याला तीन वर्ष झाली़ मी तीन वर्षांपासून पंतप्रधानांना सातत्याने पत्र पाठवून लोकपाल कायद्याची अंमलबजावणी व शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी मागणी करीत आहेत़ पण अद्याप लोकपालचे स्वप्न सत्यात उतरले नाही़ तीन वर्ष झाले तुम्ही सत्तेत येऊन, मी प्रयत्न करतोय, पण तुम्ही प्रतिसाद देत नाहीत़ तुम्ही पंतप्रधान झाले त्यावेळी संसदेच्या पायºयांवर माथा टेकवून या पवित्र मंदिराचे पावित्र्य राखण्याचे घोषित केले होते़ पण आता तीन वर्षांनंतरही लोकपाल, लोकआयुक्त कायद्याची अंमलबजावणी केली नाही़ संसदेत तुम्ही लोकपाल कायदा अंमलात आणण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ वर्ग एक, दोन, तीन व चार गटातील अधिकारी, कर्मचारी लोकपाल, लोकआयुक्तांच्या अंमलात आणण्याचे तुम्ही आश्वासन दिले होते़ पण ते वचन तुम्ही पाळले नाही़ श्रीरामचंद्र म्हणतात, प्राण जाए पर वचन ना जाए़ पण तुम्ही तर वचनच मोडून काढीत आहात़ तर मग आम्ही का राम म्हणायचे, असा सवाल हजारे यांनी उपस्थित केला आहे़तुम्ही फक्त जनतेला संकल्प करण्याचे आदेश देत आहेत़ जनतेने संकल्प करुन काय होणार आहे? जनतेला अधिकार मिळायला हवेत़ देशात सध्या जी परिस्थिती आहेत, ती सहन होत नाही़ म्हणून मीच आत्मक्ल्लेश करीत आहे़ शेतकरी सुखी व्हावा, असे गांधींजीचे स्वप्न होते़ पण शेतकºयांचे आज खूप हाल होत आहेत़ शेतकºयांच्या जीवावर व्यापारी श्रीमंत झाले आहेत़ सरकार स्वामीनाथन आयोगाबाबत निर्णय घेत नाही़ त्यांच्या दप्तरात स्वामीनाथन आयोगाची फाईल बंद झाली आहे, अशा शब्दात हजारे यांनी सरकारवर टीका केली.