संजीवनी पॉलिटेक्निकचे तीनशे विद्यार्थी झाले वर्षभरात नोकरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:44+5:302021-08-18T04:26:44+5:30

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल ...

Three hundred students of Sanjeevani Polytechnic became employees during the year | संजीवनी पॉलिटेक्निकचे तीनशे विद्यार्थी झाले वर्षभरात नोकरदार

संजीवनी पॉलिटेक्निकचे तीनशे विद्यार्थी झाले वर्षभरात नोकरदार

कोपरगाव : संजीवनी के. बी. पी. पाॅलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये नामांकित कंपन्यांमध्ये तब्बल ३०३ विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकालाअगोदरच नोकऱ्या मिळवून देऊन त्यांचे नोकरदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून ते वयाच्या १९व्या वर्षीच कुटुंबाचा आधार बनले आहे, यात मुलींची संख्याही उल्लेखनीय आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

कोल्हे म्हणाले, सध्याच्या काळात अनेक बेरोजगार हातांना काम नाही तर, अनेक कामांना योग्य हात नाहीत. परंतु, ही विषमता संजीवनी पाॅलिटेक्निकने वेळीच ओळखून उद्योग जगताला नेमके काय तंत्रज्ञानाधिष्ठित नवोदित अभियंते पाहिजेत, याचा सातत्याने विचार करून शाखानिहाय तसे अधिकचे ज्ञान दिल्याने संजीवनचे विद्यार्थी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कसोटीत उतरले.

बजाज ऑटो लिमिटेड (३०), कमिन्स इंडिया प्रा. लि., (२९), मदरसन टेक्नॉलाॅजीस अँड इंजिनीअरिंग (२७), पोराईट इंडिया लि., (६), यझाकी (६), रेनाटा प्रेसिझन काम्पोनंट्स (१०), सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग कार्पोरेशन (१३०), इन्फोसिस (२), केपीआयटी (२), फिलिप्स (२), श्नायडर इलेक्ट्रिक (१), अर्सेलर मित्तल निप्पाॅन स्टील (१), शारदा मोटर्स (१६), इपिटोम काम्पोनंटस् प्रा. लि. व एल अँड टी डीफेन्स (४) अशी निवड झाली आहे.

Web Title: Three hundred students of Sanjeevani Polytechnic became employees during the year