पिस्तूलसह तिघांना अटक
By Admin | Updated: September 26, 2014 00:17 IST2014-09-26T00:10:30+5:302014-09-26T00:17:11+5:30
अहमदनगर: कोठी येथील खालकर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये बाबासाहेब एकनाथ चेंडवल (रा. गुंजाळे,ता. राहुरी) याला एक गावठी पिस्तूल व दोन जीवंत काडतुसांसह अटक करण्यात आली.

पिस्तूलसह तिघांना अटक
अहमदनगर: कोठी येथील खालकर हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये बाबासाहेब एकनाथ चेंडवल (रा. गुंजाळे,ता. राहुरी) याला एक गावठी पिस्तूल व दोन जीवंत काडतुसांसह अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तारकपूर बसस्थानक परिसरात महारसिंग इंदरसिंग जुनेजा (रा. मध्यप्रदेश) आणि अनिस सनपत खरते (रा.मध्यप्रदेश) या दोघांना एक गावठी पिस्तूल आणि एक जीवंत काडतुसासह अटक केली. पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.