शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा पोलिसांवर हल्ला ; पाठलाग करून दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली. चौघांना अटक : एक पसार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:56 IST

घारगाव : संगमनेर तालुक्यातील माळवाडी (बोटा) येथे दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या पाच जणांच्या टोळीतील चौघांना घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा इतर एक साथीदार फरार झाला आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन दुचाकी, एक सत्तुर, एक चाकु, पकड, स्क्रु ड्रायव्हर, दगडे व मिरची पुड असा एकुण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील माळवाडी (बोटा) येथे दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या पाच जणांच्या टोळीतील चौघांना घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा इतर एक साथीदार फरार झाला आहे. आरोपींच्या ताब्यातून दोन दुचाकी, एक सत्तुर, एक चाकु, पकड, स्क्रु ड्रायव्हर, दगडे व मिरची पुड असा एकुण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जानकु लिंबाजी दुधवडे (वय २२  रा. गाढवलोळी, अकलापूर), संजय निवृत्ती दुधवडे ( रा. गाढवलोळी,अकलापुर), दत्तु बुधा केदार( वय १९ रा. नांदुर खंदरमाळवाडी), राजू सुरेश खंडागळे वय २५ रा. माळवाडी ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. भाऊ लिंबा दुधवडे (वय २५ रा. गाढवलोळी) हा फरार झाला आहे. सर्वजण संगमनेर तालुक्यातील पठारभागातील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय विखे,पोलीस नाईक गणेश लोंढे हे बुधवारी पहाटेच्या वेळी गस्त घालत असताना माळवाडी (बोटा )परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाच जणांची टोळी संशयास्पदरित्या मिळून आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांवर सत्तुराने हमला व दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड,हरिचंद्र बांडे,प्रमोद चव्हाण,संतोष फड आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.  या पोलीस पथकाने त्यातील चौघांना ताब्यात घेतले असून एकजण पसार झाला आहे. 

 

पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत हे करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी