शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

भगवंताशिवाय परमार्थात अर्थ नाही

By admin | Updated: August 4, 2014 00:43 IST

संगमनेर : निसर्गाचा परस्परविरोधी समन्वय साधण्याचे काम संत करीत असतात.

संगमनेर : निसर्गाचा परस्परविरोधी समन्वय साधण्याचे काम संत करीत असतात. जोपर्यंत भगवंत तुमच्यात येत नाही, तोपर्यंत परमार्थात काही अर्थ नाही, असे प्रतिपादन सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रीक्षेत्र तळेगाव दिघे येथे आयोजित सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. जीवनात सुख-समाधान प्राप्त करायचे असेल तर प्रत्येकाने परमार्थ करावा. व्यसन व वाईट सवयींपासून दूर जाणे महत्वाचे आहे. मनात काम, क्रोध व लोभ असेल तर परमार्थाचा उपयोग नाही. आधी मनातील वाईट विचार नष्ट करायला हवे. सत्संगात आत्मविश्वासाने राहिल्यास नक्कीच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी दूध संघाचे संचालक रणजीत देशमुख, शरयू देशमुख, दिलीप शिंदे, रावसाहेब म्हस्के, शिवशाहीर विजय तनपुरे, नवनाथ महाराज आंधळे, अजय फटांगरे, कपील पवार, अण्णासाहेब थोरात, बाळकृष्ण कापसे, अविनाश सोनवणे, मनोज चव्हाण, सचिन दिघे, प्रभाकर कांदळकर, रावसाहेब दिघे आदींसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, येवला, सिन्नर, निफाड व अकोले तालुक्यातून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी करून आभार मानले. (प्रतिनिधी) मदतीचे आवाहनमाळीण गावावर डोंगरकडा कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले गेले. जे वाचले त्यांचा संसार गाळामध्ये गडप झाला. म्हणून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून दुर्घटनाग्रस्तांना मदत करावी.- महंत रामगिरी महाराज